कंगना राणौतने असा शूट केला ‘मणिकर्णिका’चा युद्धप्रसंग! व्हिडीओ पाहून हसून हसून दुखेल पोट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 12:06 PM2019-02-22T12:06:29+5:302019-02-22T12:13:32+5:30
होय, तूर्तास कंगनाच्या एका वॉर सीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या सीनमध्ये कंगना इंग्रजांसोबत युद्ध करताना दिसतेय. प्रसंग तर युद्धाचा आहे. पण तो कसा शूट झाला, हे पाहून तुमचे हसून हसून पोट दुखेल.
ठळक मुद्देअर्थात हा नकली घोडा क्लोजअप शॉटसाठी होता. दूरच्या शॉटसाठी कंगनाने ख-या घोड्यावरचं सीन शूट केले होते.
कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाने हळूहळू का होईना, १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री मिळवली. कंगनाच्या या चित्रपटातील अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. सोबत चित्रपटातील प्रत्येक युद्धाच्या दृश्याचीही चर्चा झाली. पण हे युद्धाची दृश्ये कशी शूट झालीत, हे पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.
This is how----Kangana RANAUT rode her horse in the battlefield scenes in the film---*MANIKARNIKA*!👇👇👇😜 pic.twitter.com/KNFi59vxKt
— KAILASH SAMANTARAY (@KailashSam1) February 21, 2019
होय, तूर्तास कंगनाच्या एका वॉर सीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या सीनमध्ये कंगना इंग्रजांसोबत युद्ध करताना दिसतेय. प्रसंग तर युद्धाचा आहे. पण तो कसा शूट झाला, हे पाहून तुमचे हसून हसून पोट दुखेल. होय, कंगना युद्धात ज्या घोड्यावर बसून युद्ध करतेय, तो घोडाच मुळात खोटा आहे. घोड्याची प्रतिकृती एका मशीनवर लागलेली आहे. याच घोड्यावर कंगना बसते आणि तलवारबाजी करते. व्हिडिओ जरा काळजीपूर्वक बघितल्यावर तुम्हाला कळेल की, या घोड्याला ना शेपूट आहे, ना पाय. कंगनाही यामुळे ट्रोल होतेय. अर्थात हा नकली घोडा क्लोजअप शॉटसाठी होता. दूरच्या शॉटसाठी कंगनाने ख-या घोड्यावरचं सीन शूट केले होते. पण तरिही या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवली जातेय.
लकडी की काठी, काठी का घोडा...असे एका युजरने लिहिले आहे. अन्य एका युजरने हा व्हिडिओ पाहून ‘घोडा छाप’ असे लिहिले आहे. आणखी एका युजरने ‘खोदा पहाड निकली चुहिया’ अशा शब्दांत कंगनाची मजा घेतली आहे. तुम्हाला आठवत असेलचं की, या चित्रपटासाठी तब्बल वर्षभर घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतल्याचे कंगनाने अगदी अभिमानाने सांगितले होते. घोडेस्वारी सोपी नसते. एका सीनमध्ये तर मी थोडक्यात बचावले, असे कंगना म्हणाली होती.