‘सुधरा नाहीतर घरात घुसून मारेन...’, Kangana Ranautची 'चंगू-मंगू' गँगला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 02:36 PM2023-02-06T14:36:27+5:302023-02-06T14:37:08+5:30

Kangana Ranaut : कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत हा धमकी वजा इशारा दिली आहे.

Kangana Ranaut News : 'mind well or I will beat you', Kangana Ranaut's threat to the 'Changu-Mangu' gang | ‘सुधरा नाहीतर घरात घुसून मारेन...’, Kangana Ranautची 'चंगू-मंगू' गँगला धमकी

‘सुधरा नाहीतर घरात घुसून मारेन...’, Kangana Ranautची 'चंगू-मंगू' गँगला धमकी

googlenewsNext


Kangana Ranaut: स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना राणौत तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. कंगना रणौत प्रत्येक प्रमुख मुद्द्यावर आपले मत मांडत असते. कंगनाने बॉलीवूड माफियांपासून राजकारणावरही भाष्य केले आहे. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले आहे. कंगना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि स्टेटसद्वारे तिचा राग काढत असते. दरम्यान, कंगनाने पुन्हा एकदा बॉलिवूडच्या माफियांविरोधात आवाज उठवला आहे. 

'हे लोक सुधारले नाहीत, तर घरात घुसून मारेल', असा थेट धमकी वजा इशाराच कंगनाने दिला आहे. कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले की, 'जे लोक माझी काळजी करत आहेत, त्यांना सांगू इच्छिते की, काल रात्रीपासून माझ्या आजूबाजूला कोणताही संशयास्पद प्रकार घडला नाही. कोणीही कॅमेरा घेऊन किंवा कॅमेर्‍याशिवाय माझा पाठलाग करत नाहीये. बघा, ज्या लोकंना लाथांची भाषा कळते, त्यांना त्याच भाषेत बोलावं लागतं....'

'चांगू मंगू टोळीसाठी एक संदेश आहे. तुमचा एखाद्या साध्या-भोळ्या व्यक्तीशी सामना झालेला नाही, वेळीच सुधरा नाहीतर घरात घुसून मारेन. तुम्हाला वाटत असेल की, मी पागल आहे. पण, मी किती मोठी पागल आहे, हे तुम्हाला माहित नाही...' अशी स्टोरी कंगनाने इंस्टाग्रामवर लिहिली.

नेमकं काय झालं?
कंगनाने अशी पोस्ट करण्यामागचे कारण म्हणझे, नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले होते की कोणीतरी तिला फॉलो करत आहे. घरापासून घराच्या छतापर्यंत सर्वत्र पाठलाग केला जातोय. 

Web Title: Kangana Ranaut News : 'mind well or I will beat you', Kangana Ranaut's threat to the 'Changu-Mangu' gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.