कंगना रनौतने सांगितली तिच्या टॅटूची कहाणी, म्हणाली - आता टॅटूला फायनल लूक मिळालाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 02:56 PM2020-08-31T14:56:08+5:302020-08-31T14:57:02+5:30
कधी बॉलिवूडमधील कलाकारांना टार्गेट करते तर कधी देशातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर मजेदार ट्विट करत करून ती नेहमी चर्चेत राहते. कंपनाने तिच्या टॅटूबाबत नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
कधीकाळी सोशल मीडियाच्या नावापासूनही दूर राहणारी कंगना रनौत आज सुपर अॅक्टिव झाली आहे. काही दिवसांपासून ती सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म सतत काहीतरी नवीन शेअर करत असते. कधी बॉलिवूडमधील कलाकारांना टार्गेट करते तर कधी देशातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर मजेदार ट्विट करत करून ती नेहमी चर्चेत राहते. कंपनाने तिच्या टॅटूबाबत नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
कंगनाने आपल्या पोस्टमध्ये तिच्या मानेवर असलेल्या सुंदर टॅटूचा फोटो शेअर केलाय. या फोटो तिच्या टॅटूा क्लोजअप आहे. जो फारच सुंदर दिसतो आहे. कंगनाने हा टॅटू साधारण २ दशकांआधी म्हणजे २० वर्षांआधी काढून घेतला होता. पण वेळोवेळी तिने या टॅटूच्या डिझाइनमध्ये बदल केले. आता या टॅटूला फानयल लूक मिळाला आहे.
More than a decade ago I got two wings on the nape of my neck but they didn’t make any sense, after few months I added a crown, still it wasn’t enough, then I pierced it all with a sword suddenly my tattoo came alive, glory comes only after the pain. pic.twitter.com/Wk4FS9KIcZ
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 31, 2020
कंगनाने ट्विटरवर तिच्या आकर्षक टॅटूबाबत काही खास सांगितले आहे. कंगनाने लिहिले की 'एक दशकपेक्षाही आधी मी माझ्या मानेच्या बरोबर खाली विंग्स बनवले होते. पण त्याचा काही अर्थ निघाला नाही. मग काही महिन्यांनतर मी यात एक क्राउन तयार करून घेतला. पण तरी सुद्धा यात काहीतरी कमतरता होती. त्यानंतर मी या टॅटूच्या मधे तलवार काढून घेतली आणि अचानक यात जीव आला. चमक नेहमी वेदनेनंतरच येते'.
कल रात माता जी को उत्सुकता से फ़ोन करके पूछा कैसा लगा इंटर्व्यू,तो वो रो पड़ी, कहने लगी मैं तुम्हारी शादी केलिए उपवास करती हूँ तुम दुनिया भर में अपने साथ हुए गंदे हादसों को बताती ही रहती हो।अब फ़ोन पे फ़ोन आ रहे हैं लगता है उनका रोने का नहीं रुलाने का इरादा है, क्या किया जाए? 🙂 pic.twitter.com/3490VY6DHW
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 30, 2020
कंगनाने नुकतीच ट्विटरवर तिच्या आईला होणाऱ्या चिंतेबाबत सांगितले होते. कंगनाने लिहिले होते की, 'काल रात्री आईला उत्सुकतेने फोन करत विचारले की, मुलाखत कशी वाटली. तर अचानक रडू लागली. म्हणाली, तुझ्या लग्नासाठी मी उपवास करते. तू जगभरात तुझ्यासोबत झालेल्या विचित्र घटनांबाबत सांगत असते. आता फोन येत आहेत तिचे फोनवर फोन येत आहेत. असं वाटतं त्यांचा रडण्याचा नाही तर रडवण्याचा विचार आहे?'.
हे पण वाचा :
कंगनाची टीव्हीवरची मुलाखत पाहून घाबरली आई, रडत रडत म्हणाली...
बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती; कंगना राणौतचे राम कदमांना उत्तर