धाडसी फायटर पायलटच्या भूमिकेत दिसणार कंगना राणौत, डिसेंबरमध्ये सुरू करणार 'तेजस'चे शूटिंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 06:40 PM2020-08-28T18:40:45+5:302020-08-28T18:41:11+5:30

कंगनाचे चाहते तिला फायटर पायलटच्या भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

Kangana Ranaut to play brave fighter pilot, to start shooting for 'Tejas' in December | धाडसी फायटर पायलटच्या भूमिकेत दिसणार कंगना राणौत, डिसेंबरमध्ये सुरू करणार 'तेजस'चे शूटिंग 

धाडसी फायटर पायलटच्या भूमिकेत दिसणार कंगना राणौत, डिसेंबरमध्ये सुरू करणार 'तेजस'चे शूटिंग 

googlenewsNext

मागील वर्षी 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'च्या अभूतपूर्व यशानंतर आरएसवीपीचा वायु सेनेवरील आगामी चित्रपट 'तेजस' या वर्षीच्या डिसेंबरमध्ये चित्रीकरणासाठी सज्ज असल्याची घोषणा केली. कंगना राणौत अभिनीत 'तेजस' एक साहसी आणि निडर फाइटर पायलटची कहाणी आहे. 2016 मध्ये भारतीय वायु सेना महिलांना प्रत्यक्ष युद्ध भूमिकेत सहभागी करणारी देशातील पहलीच सुरक्षा सेना होती आणि हा चित्रपट याच ऐतिहासिक घटनेने प्रेरित आहे.

कंगना म्हणते की, “तेजस एक विस्ताराने सांगितलेली कहाणी आहे, ज्यात मला वायु सेनेच्या पायलटची भूमिका निभावण्याचे सौभाग्य मिळाले. मी एका अशा चित्रपटाचा भाग बनून स्वतःला गौरवशाली अनुभवत आहे, जिथे गणवेषात प्रत्येक पराक्रमी पुरुष आणि महिलेला सलाम केला जाईल, जो प्रत्येक दिवशी आपल्या कर्तव्यात अपार बलिदान करतात... आमच्या चित्रपटात सशस्त्र दल आणि यातील हिऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. सर्वेश आणि रॉनीसोबत या प्रवासासाठी मी खूपच उत्साहित आहे."


अभिमानाची भावना निर्माण करण्याच्या हेतूने लिहिण्यात आलेली आणि सर्वात महत्वपूर्ण, आपल्या राष्ट्राच्या तरुणांना प्रेरित करत या चित्रपटात आपल्याला काही सर्वात आव्हानात्मक मिशनचा परिचय करून देण्यात येणार आहे. सर्वेश मेवाडाद्वारे लिखित आणि दिग्दर्शित करण्यात आलेली, ही उरी: द सर्जिकल स्ट्राइक नंतर आरएसवीपीची ही दुसरी फिल्म आहे.

'माझ्या ड्रिंकमध्ये तो काहीतरी मिसळवून द्यायचा', कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा

कंगनाचे चाहते तिला फायटर पायलटच्या भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

Web Title: Kangana Ranaut to play brave fighter pilot, to start shooting for 'Tejas' in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.