बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रणौत वैमानिकाच्या भूमिकेत, 'तेजस' ची रिलीज डेट जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 01:07 PM2023-07-05T13:07:02+5:302023-07-05T13:07:46+5:30

कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट करत सिनेमातील लुक शेअर केला आहे.

kangana ranaut playing role of pilot in next movie called tejas releasing on 20 october | बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रणौत वैमानिकाच्या भूमिकेत, 'तेजस' ची रिलीज डेट जाहीर

बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रणौत वैमानिकाच्या भूमिकेत, 'तेजस' ची रिलीज डेट जाहीर

googlenewsNext

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) आगामी सिनेमातून पुन्हा आपल्या अभिनयाची छाप पाडण्यास सज्ज आहे. 'तेजस' या सिनेमात कंगना वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यातील कंगनाचा लुक आणि सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. पायलटच्या वेशात कंगनाला बघून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 

कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट करत सिनेमातील लुक शेअर केला आहे. तिने लिहिले, "वायुसेनेच्या वैमानिकांच्या शौर्याचा सन्मान. 'तेजस' २० ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे." कंगनाच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

'तेजस' हा सिनेमा वायुसेनेची वैमानिक तेजस गिलवर आधारित आहे. जिम्मा सर्वेश मेवाडा यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तसंच लिखाणाचं कामही केलं आहे. यामध्ये कंगना जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. तिच्यासोबत अंशुल चौहान, वरुण मित्रा आणि पंकज त्रिपाठी यांचीही मुख्य भूमिका आहे. 

'तेजस' शिवाय कंगनाचा 'इमर्जन्सी' हा सिनेमाही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यामध्ये तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. तिचा या भूमिकेतील लुक खूपच चर्चेत होता आणि पसंत केला गेला. या व्यतिरिक्त कंगनाच्या होम प्रोडक्शन अंतर्गत 'टीकू वेड्स शेरु' सिनेमा प्रदर्शित झाला. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांची भूमिका होती.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: kangana ranaut playing role of pilot in next movie called tejas releasing on 20 october

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.