8 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले कंगना अन् आर माधवन; सुपरस्टार रजनीकांतची खास एन्ट्री...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 05:09 PM2023-11-18T17:09:06+5:302023-11-18T17:09:56+5:30

Kangana Ranaut R Madhavan Film: 'तनु वेड्स मनू'च्या जबरदस्त यशानंतर कंगना आणि माधवन पुन्हा एकत्र आले आहेत.

Kangana Ranaut R Madhavan Film: Kangana and R Madhavan reunite after 8 years for a film | 8 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले कंगना अन् आर माधवन; सुपरस्टार रजनीकांतची खास एन्ट्री...

8 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले कंगना अन् आर माधवन; सुपरस्टार रजनीकांतची खास एन्ट्री...

Kangana Ranaut R Madhavan Film: 'तनु वेड्स मनू'च्या जबरदस्त यशानंतर कंगना राणौत आणि आर. माधवन पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्यांनी आगामी चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे. रोमँटिक कॉमेडीनंतर आता दोघे एका सायकोलॉजिकल थ्रिलरमध्ये दिसणार आहेत. चेन्नईत आजपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून, कंगनाने सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली. 

कंगनाने सोशल मीडियावर चित्रपटाची घोषणा केली आणि चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटोही शेअर केले. मात्र अद्याप चित्रपटाचे नाव जाहीर केले नाही. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी 'थलैयवी' चित्रपटाचा दिग्दर्शक विजय करत आहे.

फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले की, “आज चेन्नईमध्ये आम्ही आमच्या नवीन सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटाची शूटिंग सुरू केली. या अतिशय असामान्य आणि रोमांचक स्क्रिप्टला तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची गरज आहे." 

चित्रपटाच्या सेटवर सुपरस्टार रजनीकांत यांनीही अचानक एन्ट्री घेतली, ज्यामुळे सर्वजण चकीत झाले. कंगनाने रजनीकांत यांच्यासोबतचाही एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने म्हटले की, थलैवा आमच्या चित्रपटाच्या सेटवर पोहोचले आणि आम्हा सर्वांना चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, जीवी प्रकाश कुमार चित्रपटाला संगीत देत आहे. हा चित्रपट हिंदी आणि तमिळ दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होईल. 

Web Title: Kangana Ranaut R Madhavan Film: Kangana and R Madhavan reunite after 8 years for a film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.