Padma Shri Awards : पद्मश्री पुरस्कारावर कंगणा राणौतचे बेधडक वक्तव्य, म्हणाली माझ्या विरोधातही रचले गेले षडयंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 17:48 IST2020-01-30T17:44:54+5:302020-01-30T17:48:02+5:30
Padma Shri Awards 2020 : भारतरत्न आणि राष्ट्रीय पुरस्कारानंतर हा भारताचा सर्वात मोठा सन्मान आहे. यादीत माझेही नाव आहे याचा आनंद असल्याचे तिने म्हटले आहे.

Padma Shri Awards : पद्मश्री पुरस्कारावर कंगणा राणौतचे बेधडक वक्तव्य, म्हणाली माझ्या विरोधातही रचले गेले षडयंत्र
बॉलीवुडची ट्रेंडसेटर आणि बॉलिवूड क्वीन म्हणून अभिनेत्री कंगणा ओळखली जाते. बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे कंगणाच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगलेली असते. पुन्हा एकदा अशाच एका कारणामुळे ती चर्चेत आली आहे. पद्मश्री पुरस्कारावरकंगणाने खास वक्तव्य केले आहे. पद्मश्री पुरस्काराच्या यादीत कंगनाचे देखील नाव आहे. खरंतर पद्मश्री तिला तीन वर्षांपूर्वीच मिळायला हवा होता असे तिने आपले मत व्यक्त करत ज्यांनी ज्यांनी पद्मश्रीसाठी कंगणाचे नाव सुचवले आहे त्यांचे देखील तिने आभार मानले आहेत.
भारतरत्न आणि राष्ट्रीय पुरस्कारानंतर हा भारताचा सर्वात मोठा सन्मान आहे. यादीत माझेही नाव आहे याचा आनंद असल्याचे तिने म्हटले आहे.
यावरच ती थांबली नाही यावेळी अदनान सामीदेखील या पुरस्कारासाठी योग्य असल्याचे तिने म्हटले आहे. गेले २० वर्षापासून संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मुळात ते भारताचे नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना हा सन्मान देण्यात काहीच हरकत नसून जे या गोष्टीचा विरोध करत आहेत त्यांना अजूपर्यंत आपला भारत कळलाच नसावा अशीही टीका तिने विरोधकांवर केली आहे.
आता कंगनाही लग्नासाठी तयार आहे. एका मुलाखतीत कंगना लग्नाच्या प्लॉनिंगबद्दल बोलली. ‘योग्य जोडीदार निवडणे निश्चितपणे कठीण आहे. पण नितेश तिवारीला (‘पंगा’ या सिनेमाची दिग्दर्शिता अश्विनी अय्यर हिचा पती) भेटल्यानंतर लग्नाबद्दलचे माझे मत बदलले आहे. तो आपल्या लग्नात प्रचंड आनंदी आहे. पत्नीच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा आहे. आता कदाचित मी सुद्धा लग्नासाठी तयार आहे,’ असे कंगना यावेळी म्हणाली.