करिनाचं सोडा; सीतेच्या भूमिकेसाठी कंगनाच्या मानधनाचा आकडा वाचून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 04:47 PM2021-09-20T16:47:39+5:302021-09-20T16:51:13+5:30

सीतेच्या भूमिकेसाठी करिनानं 12 कोटी मागितल्याची चर्चा होती, कंगना तर तिच्यापेक्षाही ‘महाग’ झाली...

Is Kangana Ranaut Really Charging 32 Crores For Sita – The Incarnation? | करिनाचं सोडा; सीतेच्या भूमिकेसाठी कंगनाच्या मानधनाचा आकडा वाचून थक्क व्हाल

करिनाचं सोडा; सीतेच्या भूमिकेसाठी कंगनाच्या मानधनाचा आकडा वाचून थक्क व्हाल

googlenewsNext
ठळक मुद्देकंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, कंगनाचा ‘थलायवी’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सध्या ती तेजस आणि धाकड या सिनेमात बिझी आहे. 

एका पौराणिक चित्रपटात सीता मातेच्या भूमिकेत करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि बेबो वादात सापडली. सीता मातेच्या या भूमिकेसाठी बेबोने 12 कोटी रूपयांची मागणी केल्याची चर्चा कानावर आल्यावर तर लोक आणखीच बिथरले. अगदी करिनाविरोधात संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर सीता मातेच्या भूमिकेत करिना दिसलीच तर तिला बॉयकॉट करू, सिनेमाचे प्रदर्शन हाणून पाडू, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. इतके कमी की काय म्हणून बरजंग दलानेही या वादात उडी घेतली. तू सीतेची भूमिका कर मग आम्ही बघतोच, अशी धमकीवजा इशाराच बजरंग दलाने दिला. इतक्या मोठ्या वादानंतर या सिनेमातून करिनाचा पत्ता कट झाला आणि तिच्या जागी वर्णी लागली ती कंगना राणौतची (Kangana Ranaut). आता तिच्या मानधनाची चर्चा रंगणार नसेल तर नवल. होय, चर्चा खरी मानाल कंगनाने या भुमिकेसाठी करिनापेक्षा दुपटीने अधिक मानधन घेतलं. 

कंगना वा तिच्या टीमकडून मानधनाच्या आकड्याबद्दल अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. पण चर्चेनुसार, कंगनाने या सिनेमासाठी तब्बल 32 कोटी इतकं मानधन घेतलं आहे.

केआरके अर्थात कमाल आर खान यानेही आपल्या व्हिडीओमध्ये हाच दावा केला आहे. बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच अभिनेत्रीला इतकं मानधन देण्यात येत आहे,असा त्याचा दावा आहे. आता केआरकेचा हा दावा किती खरा, किती खोटा माहित नाही. मात्र सध्या तरी कंगनाचे भाव वधारले, हेच ऐकायला येतंय.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, कंगनाचा ‘थलायवी’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सध्या ती तेजस आणि धाकड या सिनेमात बिझी आहे. 

 

Web Title: Is Kangana Ranaut Really Charging 32 Crores For Sita – The Incarnation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.