Kangana Ranaut : ती रात्र, 'अॅसिड हल्ला', भीती..कंगना राणावतला आठवले भयावह क्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 03:28 PM2022-12-15T15:28:09+5:302022-12-15T15:30:18+5:30
अभिनेत्री कंगना राणावतला बहिणीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याची आठवण झाली आहे. कंगना राणावतची बहिण रंगोली ही अॅसिड हल्ल्याच्या वेदनेतुन गेली आहे.
Kangana Ranaut : महिलांवर होणारे अॅसिड हल्ले (Acid Attack) अजुनही सुरुच आहेत. दिल्लीच्या द्वारका येथे १७ वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला झाला. हे प्रकरण ऐकल्यावर अभिनेत्री कंगना राणावतला बहिणीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याची आठवण झाली आहे. कंगना राणावतची बहिण रंगोली ही अॅसिड हल्ल्याच्या वेदनेतुन गेली आहे. कंगनाने स्टोरी शेअर करत या भयानक घटनेबद्दल सांगितले आहे.
कंगनाने लिहिते, मी लहान असताना रंगोलीवर एका रोडसाईड रोमिओने अॅलिड हल्ला केला होता. यानंतर ती डिप्रेशन मध्ये गेली होती. शारिरीक आणि मानसिकरित्या पूर्णपणे तुटली होती. आम्ही सर्वच तुटलो होतो. मी सुद्धा इतकी घाबरले होते की मला थेरपी घेण्याची गरज पडली होती. माझ्यावरही कोणी हल्ला करेल अशी मला भीती होती. बाजूने कोणती कार किंवा बाईक गेली की मी चेहरा झाकून घ्यायचे. हे अत्याचार अजुन थांबलेले नाहीत. सरकारने दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे मुळात असे अत्याचार होऊच नये इतका धाक असला पाहिजे. मला गौतम गंभीरचे म्हणणे पटले. अॅसिड हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.
कंगना म्हणाली, रंगोलीच्या जखमा आजही भरलेल्या नाहीत. पण ती हिंमतीने या संकटाला सामोरी गेली आहे. रंगोलीचे लग्न झाले आहे आणि एका मुलाची आई आहे. हल्ला झाला तेव्हा ती २१ वर्षांची होती. तिचा अर्धा चेहरा जळाला होता. एका डोळ्याची दृष्टी गेली होती. एक कान ओघळला होता आणि ब्रेस्ट डॅमेज झाले होते.
"नुसतं बोलून काही होणार नाही, सर्वांसमोर फाशी द्या", गौतम गंभीर दिल्लीतील 'त्या' प्रकरणावर संतापला!
काही दिवसांपुर्वीच दिल्लीतील द्वारका परिसरात एका १७ वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडीस आलं. या घटनेनंतर पीडितेला सफदरजंगच्या रुग्णालयात दाखल करण्यात असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर या घटनेवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपा खासदार गौतम गंभीरनंही दिल्लीतील अॅसिड हल्ला प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. अॅसिड हल्ला करणाऱ्या त्या नराधमाला सार्वजनिकरित्या फासावर लटकवलं पाहिजे, असं रोखठोक मत गंभीरनं व्यक्त केलं आहे.