'आधी कानफडात खाल्लीस आता थेट..', कंगना राणौतला मिळाली जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 11:56 AM2024-08-27T11:56:00+5:302024-08-27T11:56:33+5:30

 अभिनेत्रीने हा व्हिडीओ हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाब पोलिसांना टॅग केला आहे.

Kangana Ranaut Received Death Threats Movie Emergency | 'आधी कानफडात खाल्लीस आता थेट..', कंगना राणौतला मिळाली जीवे मारण्याची धमकी

'आधी कानफडात खाल्लीस आता थेट..', कंगना राणौतला मिळाली जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूड क्विन कंगना राणौत हिला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ट्विवटरवर एक व्हिडीओ समोर आला आहे. हा धमकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.  अभिनेत्रीने हा व्हिडीओ हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाब पोलिसांना टॅग केला आहे.

कंगना राणौतने प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती 'इमर्जन्सी' सिनेमा रिलीज न करण्याची धमकी देत ​​आहे.  तो म्हणतोय, "जर तू हा चित्रपट रिलीज केलास तर शीख बांधव तुला चप्पल फेकून मारतील. आधी कानफडात खाल्ली आहेस. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. माझ्या देशात आणि महाराष्ट्रात कुठेही दिसली तर मी आधीच सांगतोय. फक्त शीख, मराठीच नाही तर माझे सर्व हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिम बांधव चप्पल घालून तुझं स्वागत करतील".

व्हिडीओमध्ये दुसरा एक व्यक्ती म्हणतो,  "इतिहास बदलता येत नाही. जर चित्रपटात शीखांना दहशतवादी म्हणून दाखवलं तर लक्षात ठेवं. तु ज्यांचा चित्रपट बनवत आहेस. त्याचे काय झाले होते. सतवंत सिंग आणि बेअंत सिंग कोण होते? आम्ही आमचे शिर संतजींसाठी कापू शकतो तर शिरच्छेदही करू'. 


अभिनेत्रीचे चाहते तिच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आहेत. एकाने लिहलं की, 'भारताच्या आयर्न लेडीची कहाणी सांगणे चुकीचे आहे का, ज्यांना भारताचे सर्वात बलवान पंतप्रधान म्हटलं जातं?'.  'इमर्जन्सी' हा चित्रपट 6 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. जो भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांची त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली होती. या चित्रपटात कंगना राणौत ही इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे. मात्र, कंगनाचा सिनेमा वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नव्हे, याआधीही तिने अनेकदा अशा कॉन्ट्रोव्हर्सींचा सामना केला आहे.
 

Web Title: Kangana Ranaut Received Death Threats Movie Emergency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.