Kangana Ranaut : तुनिशाच्या आत्महत्येने भडकली कंगना; थेट पंतप्रधानांना केली विनंती; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 06:07 PM2022-12-28T18:07:38+5:302022-12-28T18:09:15+5:30

टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.तुनिशाला न्याय मिळावा म्हणून अभिनेत्री कंगना रणौतने थेट पंतप्रधानांकडे मागणी केली आहे.

kangana-ranaut-requests-PM-to-take-strict-actions-against-cases-related-to-women-harrassment | Kangana Ranaut : तुनिशाच्या आत्महत्येने भडकली कंगना; थेट पंतप्रधानांना केली विनंती; म्हणाली...

Kangana Ranaut : तुनिशाच्या आत्महत्येने भडकली कंगना; थेट पंतप्रधानांना केली विनंती; म्हणाली...

googlenewsNext

टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.तुनिशाला न्याय मिळावा म्हणून अभिनेत्री कंगना रणौतने थेट पंतप्रधानांकडे मागणी केली आहे.समोरची व्यक्ती फक्त शारिरीक मानसिक शोषण करत असेल तर यापेक्षा दुर्दैव ते काय.

कंगना लिहिते, ब्रेकअप, लग्न, नाती कशाचाही सामना करु शकते. मात्र तिच्या प्रेम कहाणीत प्रेमच नव्हते हे ती सहन करु शकत नाही

ही एक हत्या 

कंगनाने तुनिशाचे निधन आत्महत्या नाही तर हत्या आहे असे लिहिले. या त्रासातून जाणारी व्यक्ती अशा परिस्थितीत स्वत:वरही विश्वास ठेऊ शकत नाही. तिला जीवन आणि मरण यातलं अंतर समजू शकत नाही. जेव्हा ती व्यक्ती जीवन संपवण्याचा निर्णय घेते तेव्हा हा तिच्या एकटीचा निर्णय नसतो ती एक हत्या असते.

कंगनाने लिहिले, मी माननीय पंतप्रधानांना विनंती करते की जसे श्रीकृष्ण द्रौपदीसाठी आले होते राम जी सीता मा च्या बाजूने होते तसंच इच्छेविरोधात एकापेक्षा जास्त विवाह, महिलांवरील अॅसिड हल्ला, महिलांचे तुकडे करणे अशा गुन्ह्याविरोधात त्वरित फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी.

Kangana (2)

तुनिशापासून दूर राहा...

तुनिशाच्या आईने अभिनेता शिझान खानवर गंभीर आरोप केले आहेत. शिझानमुळेच मुलगी तुनिशाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. तर तुनिशाने आत्महत्या केली त्याच्या एक दिवस आधीच तुनिशाची आई मालिकेच्या सेटवर आली होती. त्यांनी शिझान खानसोबत बराच वेळ चर्चा केली. तसंच तुनिशापासून दूर राहा असंही त्यांनी शिजानला ठणकावून सांगितलं. याप्रकरणी पोलिस तपास करत असून शिझानच्या पोलिस कोठडीत ३० डिसेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Web Title: kangana-ranaut-requests-PM-to-take-strict-actions-against-cases-related-to-women-harrassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.