Kangana Ranaut : "रणबीर स्वतः माझ्या घरी आला, म्हणाला प्लीज संजूमध्ये रोल करा"; कंगना राणौतचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 12:01 PM2024-08-25T12:01:11+5:302024-08-25T12:14:42+5:30

Kangana Ranaut And Ranbir Kapoor : कंगनाने खुलासा केला की, रणबीर तिला संजूमध्ये कास्ट करू इच्छित होता. परंतु अभिनेत्रीने चित्रपटात भूमिका करण्यास नकार दिला.

Kangana Ranaut reveals she rejected sanju role says Ranbir Kapoor personally asked her | Kangana Ranaut : "रणबीर स्वतः माझ्या घरी आला, म्हणाला प्लीज संजूमध्ये रोल करा"; कंगना राणौतचा खुलासा

Kangana Ranaut : "रणबीर स्वतः माझ्या घरी आला, म्हणाला प्लीज संजूमध्ये रोल करा"; कंगना राणौतचा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान, अभिनेत्रीने बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात बोलताना रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्यावर निशाणा साधला. कंगनाने रणबीर कपूरचा सर्वात मोठा हिट चित्रपट एनिमलवरही टीका केली. 

कंगनाने खुलासा केला की, रणबीर तिला संजूमध्ये कास्ट करू इच्छित होता. परंतु अभिनेत्रीने चित्रपटात भूमिका करण्यास नकार दिला. राजकुमार हिरानी दिग्दर्शित, हा चित्रपट खूप हिट ठरला. कोणत्या रोलसाठी संपर्क साधला हे कंगनाने उघड केलं नाही. परंतु रणबीरनेच तिला चित्रपटाचा भाग होण्यास सांगितलं होतं. 

सिद्धार्थ कन्ननच्या एका मुलाखतीत कंगनाला विचारण्यात आलं की, सार्वजनिकपणे तिचा अपमान करणाऱ्या लोकांशी संवाद साधणे तिला त्रासदायक आहे का? यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने सांगितलं की, तिने मोठ्या स्टार्सच्या अनेक चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत. कंगना म्हणाली, "रणबीर स्वतः माझ्या घरी आला आणि म्हणाला, कृपया संजूमध्ये रोल करा."

राज शमनीला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कंगनाने सांगितलं की, तिने तिन्ही खानचे चित्रपट नाकारले कारण तिला विश्वास होता की त्यात महिलांसाठी चांगल्या भूमिका नसतील. कंगना म्हणाली, मी १०-१५ कोटी रुपयांची डील नाकारली कारण ते फेअरनेस क्रीम्सची जाहिरात करतात. मी यशस्वी होण्याआधीही सुरुवातीपासून अशीच होते. मी खान यांच्यासोबतचे चित्रपट नाकारले आहेत. पण मी हे स्पष्ट करते की, सर्व खान माझ्यासोबत खूप दयाळू आणि चांगले आहेत. 
 

Web Title: Kangana Ranaut reveals she rejected sanju role says Ranbir Kapoor personally asked her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.