कंगना रणौतने लगावला शिवसेनेला टोला; म्हणाली, स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांचा विनाशच होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 12:48 PM2021-03-24T12:48:47+5:302021-03-24T12:50:08+5:30

पत्रकार परिषदेत कोणाचंही नाव न घेता कंगनाने काही लोकांवर निशाणा साधला आहे. यात कंगनाच्या बोलण्याचा रोख शिवसेनेकडे असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 

kangana ranaut said if u disrespect women u will destroy | कंगना रणौतने लगावला शिवसेनेला टोला; म्हणाली, स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांचा विनाशच होतो

कंगना रणौतने लगावला शिवसेनेला टोला; म्हणाली, स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांचा विनाशच होतो

googlenewsNext
ठळक मुद्देया पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या पत्रकार परिषदेत तिने शिवसेनेला टोला लगावला असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

कंगना रणौतच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून काल तिच्या ‘थलायवी’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. चेन्नईत ‘थलायवी’चा ग्रॅण्ड ट्रेलर लॉन्च इव्हेंट आयोजित केला गेला. त्यानंतर कंगनाने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी कंगनाने स्त्रियांच्या ताकदीवर भाष्य केलं. या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या पत्रकार परिषदेत तिने शिवसेनेला टोला लगावला असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. हा व्हिडिओ वीरल भयानी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

'थलायवी'च्या ट्रेलर रिलीजनंतर मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोणाचंही नाव न घेता कंगनाने काही लोकांवर निशाणा साधला आहे. यात कंगनाच्या बोलण्याचा रोख शिवसेनेकडे असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 

या पत्रकार परिषदेत कंगनाने पत्रकारांशी गप्पा मारताना सांगितले की, गेल्या काही दिवसांत माझ्यासोबत अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या आणि आता देखील घडत आहेत. पण स्त्रिचा अपमान करणाऱ्या लोकांचा विनाश हा होणारच... इतिहास या गोष्टीसाठी साक्ष आहे. कौरवांनी द्रोपदीचा, रावणाने सीतेचा अपमान केल्यानंतर त्यांच्यासोबत काय झाले हे आपल्याला माहीतच आहे. मी कोणी देवता नाहीये... पण मी नेहमी स्वतःसाठी बोलले... मी कधीही कोणालाही इजा पोहोचवलेली नाही.... मी काहीही केले ते केवळ माझ्या सुरक्षेसाठी केले...

कंगनाने हे वक्तव्य करताना कोणाचेही नाव घेतलेले नाही... पण शिवसेना आणि तिच्यात गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या वादावरून तिने शिवसेनेला टोला लगावला असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 

Web Title: kangana ranaut said if u disrespect women u will destroy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.