आयराच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये कंगनाचे 'जय श्रीराम'चे नारे; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, "भाजपाची MLA..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 15:17 IST2024-01-14T15:16:20+5:302024-01-14T15:17:40+5:30
आयरा-नुपूरच्या रिसेप्शन सोहळ्यातील कंगनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आयराच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये कंगनाचे 'जय श्रीराम'चे नारे; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, "भाजपाची MLA..."
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. मुंबईत आयरा-नुपूरचं ग्रँड रिसेप्शन शनिवारी(१३ जानेवारी) पार पडलं. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतदेखील आयरा-नुपूरच्या रिसेप्शनला उपस्थित होती. त्यांच्या रिसेप्शन सोहळ्यातील कंगनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कंगनाने आयरा-नुपूरच्या वेडिंगसाठी खास लूक केला होता. कंगनाने डिझायनर लेहेंगा आणि खड्यांची ज्वेलरी घातली होती. तिच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये कंगनाने खास अंदाजात पापाराझींना फोटोसाठी पोझही दिल्या. यावेळी पापाराझींनी जय श्री राम म्हणताच कंगनानेही जय श्रीरामचे नारे दिले. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरून कंगनाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
कंगनाचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत "कोणत्या खानबरोबर काम करणार नाही असं म्हणाली होती" असं म्हटलं आहे. दुसऱ्याने "पहिल्यांदा कोणी तरी कंगनाला बोलवलं आहे," अशी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने "खान आणि मुस्लीमांचा राग करते, मग इथे कशाला आली?" असंही म्हटलं आहे. "आता ही भाजपाची MLA होणार", अशी कमेंटही केली आहे.
दरम्यान, आमिरचा जावई नुपूर एक फिटनेस ट्रेनर आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह तो आमिर खानचाही फिटनेस ट्रेनर राहिलेला आहे. आयरा आणि नुपूर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मे महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. आता लग्नबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.