कंगना म्हणाली, मी टॉम क्रूजपेक्षाही बेस्ट; युजर्स म्हणाले, चल झूठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 14:07 IST2021-02-10T14:05:26+5:302021-02-10T14:07:26+5:30
ट्विटनंतर कंगना सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतेय.

कंगना म्हणाली, मी टॉम क्रूजपेक्षाही बेस्ट; युजर्स म्हणाले, चल झूठी
कंगना राणौतची टिवटिव सुरु आहे. नुसती टिवटिव नाही तर आता हॉलिवूडच्या दिग्गज स्टार्ससोबत स्वत:ची तुलना करण्याचा सपाटा तिने लावलाय. कालच तिने ऑस्कर विजेती हॉलिवूड अभिनेत्री मेरिल स्ट्रीपसोबत स्वत:ची तुलना केली होती. आता कंगनाने थेट टॉम क्रूजसोबत स्वत:ची तुलना केलीये. स्टंटच्या बाबतीत मी टॉक क्रूजपेक्षाही बेस्ट आहे, असे ट्विट तिने केले आहे.
हॉलिवूडच्या ‘द ग्लेडिएटर’ आणि ‘द लास्ट समुराय’ यासारख्या लोकप्रिय चित्रपटांचे अॅक्शन डायरेक्टर निक पोवेल यांचा हवाना देत, कंगनाने हे ट्विट केले आहे. पोवेल यांनी ‘मणिकर्णिका’तील अॅक्शन सीन्ससाठी कंगनाचे कौतुक केले होते. आता त्याचाच हवाला देत कंगनाने ट्विट केले.
Ha ha ha bahut pareshaan hain librus, yeh Dekho renowned action director of Brave heart and many legendary Hollywood action films said I am better than Tom Cruise when it comes to action ...
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 9, 2021
Hahahahaha bechare librus aur tadpo. https://t.co/pVYxZhYUOM
‘हाहाहा...लिबरल खूप वैतागले आहेत. हे पाहा हॉलिवूडचे दिग्गज अॅक्शन डायरेक्टरने म्हटले होते की, मी टॉम क्रूजपेक्षाही बेस्ट आहे. हा..हा...हा... बिचारे लिब्रुज... जळफळाट होऊ द्या,’ असे ट्विट तिने केले.
कंगनाच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर कंगना जबरदस्त ट्रोल होतेय. युजर्सनी पुन्हा एकदा तिच्यावर निशाणा साधला आहे. ‘मणिकर्णिका’च्या सेटवरची एक क्लिप मध्यंतरी खूप व्हायरल झाली होती. यात कंगनाला लाकडाच्या घोड्यावर बसून स्टंट सीन्स देताना दिसली होती. युजर्सने कंगनाला याच क्लिपची आठवण करून देत, तिला ट्रोल केले. चल झूठी, असे लिहित एका युजरने तिची मजा घेतली. तिच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स सुद्धा व्हायरल झालेत.
Tom Cruise after hearing that Kangana is better in doing action tha him😂😂#Dhaakad#tomcruise#KanganaRanautpic.twitter.com/IfX2XDZDco
— Parv Jain (@ParvJai84712347) February 9, 2021
Me to my friend @devani_divyen when I saw Kangana tweet quoting "I am better than Tom Cruse & Gal Gadot when it comes to action" 🤣#GalGadot#TomCruise#KanganaRanauthttps://t.co/RomTiwq58k
— Sagar Thummar (@SRthummar0) February 10, 2021
सही पकडे हो....
— Vedant Shinde patil (@VedantShinde777) February 9, 2021
🤣😂😂#TomCruise#पागलऔरत@KanganaTeampic.twitter.com/bWFXh91BYJ
कंगना लवकरच ‘थलायवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय तिचा ‘तेजस’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या ती ‘धाकड’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.