Kangana Ranaut ने शेअर केला असा व्हिडीओ, फॅन्स म्हणाले - करण जोहरला धु-धु धुतलं....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 12:19 PM2021-11-05T12:19:47+5:302021-11-05T12:21:47+5:30

कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि करण जोहर (Karan Johar) यांच्यात अनेक वर्षांपासून भांडण सुरू आहे. मात्र दोघातील हे भांडण काह नवीन नाही.

Kangana Ranaut shared such a video fans said Karan Johar was washed away | Kangana Ranaut ने शेअर केला असा व्हिडीओ, फॅन्स म्हणाले - करण जोहरला धु-धु धुतलं....

Kangana Ranaut ने शेअर केला असा व्हिडीओ, फॅन्स म्हणाले - करण जोहरला धु-धु धुतलं....

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आपल्या दमदार अभिनयासोबत वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहे. देशातील राजकारण असो वा बॉलिवूडमधील मुद्दे कंगना प्रत्येक विषयावर आपले विचार बिनधास्तपणे मांडतात. कंगना रनौत आणि करण जोहर (Karan Johar) यांच्यात अनेक वर्षांपासून भांडण सुरू आहे. मात्र दोघातील हे भांडण काह नवीन नाही. ते अनेक वर्षापासूनचं आहे. हे कंगनाने एक व्हिडीओ शेअर करून दाखवलं आहे.

कंगना रनौत अलिकडे बॉलिवूडमधील नेपोटिज्मवर बोलत असते. तेच ती मुव्ही माफियावर सतत निशाणे साधत असते. तेच आता कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फिल्मफेअर अवॉर्डचा थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती करण जोहरकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

करण जोहर अवॉर्ड शो होस्ट करत होता आणि एका अवॉर्डसाठी कंगनाला बोलवतो. अवॉर्ड घेतल्यावर कंगना स्टेजवरून जात असते आणि त्यावेळी करण कंगनाचं लक्ष आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. ज्याकडे ती दुर्लक्ष करत पुढे निघून जाते. हा व्हिडीओ शेअर करत कंगनाने लिहिलं आहे की, 'हाहाहा, माझा एटीट्यूड आधीपासूनच खराब आहे'. दुसऱ्या पोस्टमध्ये तिनं लिहिलं की, 'इंडस्ट्रीत हे माझं पहिलंच वर्ष होतं. मी एक टीनएजरसारखी होते. पण एटीट्यूड असाच होता.

वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर कंगना रनौत लवकरच 'धाकड', 'तेजस' आणि 'इमरजन्सी' सारख्या सिनेमात दिसणार आहे. सोबतच किंगना टीकू वेड्स शेरू सिनेमाची निर्मितीही करत आहे.
 

Web Title: Kangana Ranaut shared such a video fans said Karan Johar was washed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.