मी 34 वर्षांची सुपर ह्युमन...! वाढदिवशी कंगना राणौतने लिहिली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 11:59 AM2021-03-23T11:59:27+5:302021-03-23T11:59:42+5:30
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिचा आज वाढदिवस. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत आज 34 वा वाढदिवस साजरा करतेय.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिचा आज वाढदिवस. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत आज 34 वा वाढदिवस साजरा करतेय. कालच कंगनाला चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याच्या आनंदात कंगनाने एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.
जणू मी असामान्य क्षमता असलेली सुपरह्युमन असल्याचे मला वाटतेय, असे तिने ट्विटरवर स्वत:चा एक फोटो शेअर करत लिहिले आहे.
कंगनाची पोस्ट...
They said a woman has a shelf life, this world only values young sweet 16 type girls with no brains,mature and wise woman can only belong to a household to a man who can give them a surname.They said many things it made me anxious, what will happen to me, where will I go (cont) pic.twitter.com/M3qrgqGaDF
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 23, 2021
महिलांचे एक वय असते, असे लोक म्हणायचे. हे जग केवळ बिनडोक गोड 16 टाईप मुलींना महत्त्व देते. समजुतदार व बुद्धिमान महिला केवळ एखाद्या पुरूषाचे घर सांभाळू शकतात. ते अशा अनेक गोष्टी बोलायचे आणि त्या गोष्टी मला त्रास द्यायच्या. माझे काय होणार, मी कुठे जाऊ? असे प्रश्न मला पडायचे.
Today I turned 34,they never told me,I will be at the peak of my career at 34,I will be celebrated for my art and my experience will be valued and my age or marital status would mean nothing to anyone,I feel like a super human loaded with exceptional experience about skills(cont)
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 23, 2021
आज मी 34 वर्षांची झालेय. वयाच्या 34 व्या वर्षी मी करिअरच्या शिखरावर असेन, हे त्यांनी मला कधीच सांगितले नाहे. मला माझ्या कलेमुळे लोकप्रियता मिळेल, माझे अनुभव महत्त्वाचे ठरतील आणि माझे वय वा माझी वैवाहिक स्थिती याला काहीही महत्त्व उरणार नाही, हे त्यांनी कधीच सांगितले नाही. आज मी असामान्य शक्ती असलेली सुपर ह्युमन आहे, असे मला वाटतेय. मी जाड आहे की सडपातळ याने मला काहीही फरक पडत नाही. मादक दिसणे मला आवडते आणि माझ्या सेक्शुअॅलिटीबद्दल मी सहज आहे. पिंपल्स वा पीरियड्सबद्दल मला काहीही तक्रार नाही. मी वाईट आहे, असे मला भासवण्याची आज कोणाचीही हिंमत नाही. मी सर्व मुलींना सांगू इच्छिते की, 34 व्या वर्षी मी आनंदी आहे आणि जग सुंदर भासतेय. मला जन्म देणाºया आईचे आभार..., असे कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.