कंगना रणौतच्या जीवनात झाली 'स्पेशल' कुणाचीतरी एन्ट्री? तिची ही पोस्ट लव्ह लाईफकडे करते इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 02:18 PM2021-11-29T14:18:35+5:302021-11-29T14:34:26+5:30
Kangana Ranaut : सोमवारी तिने एक रोमॅंटिक नोट शेअर केली आहे. कंगनाने तिच्या सोशल मीडिया हॅंडलवर सुंदर कॅप्शनसोबत दोन आणखी पोस्ट शेअर केल्या आहे.
कंगना रणौत (Kangana Ranaut) अशा स्टारपैकी एक आहे जिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलो केलं जातं. कंगनाने अनेक सिनेमातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. कंगनाला ट्विटरवर बॅन करण्यात आलं आहे. त्यामुळे ती इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करते. सोमवारी तिने एक रोमॅंटिक नोट शेअर केली आहे. कंगनाने तिच्या सोशल मीडिया हॅंडलवर सुंदर कॅप्शनसोबत दोन आणखी पोस्ट शेअर केल्या आहे.
पहिल्या फोटोत दोन लोक आलिंगण देताना दिसत आहे. ज्याच्या कॅप्शनला कंगनाने लिहिलं की, 'तेरे लिए हम है जिए....कितने सितम हम पे सनम...तेच दुसऱ्या पोस्टमध्ये कंगनाने बालपणीचा फोटो पोस्ट करत लिहिलं की, मी एक साधारण मुलगी आहे, माझ्यात असं काही खास नाही, पण मी प्रेमाच्या सुंदरतेत विश्वास करते आणि तेच मला या सुंदर जगाकडून मिळालं आहे.
कंगनाची ही पोस्ट पाहून स्पष्ट होत आहे की, तिचा पुन्हा एकदा प्रेमावर विश्वास बसत आहे. इतकंच नाही तर तिच्या आयुष्यात स्पेशल कुणाचीतरी एन्ट्री झाली आहे. पण हा स्पेशल कोण आहे हे अजून समोर येऊ शकलेलं नाही. दरम्यान याआधी कंगनाचं नाव आदित्य पांचोली, हृतिक रोशन, अध्ययन सुमनसोबत जुळलं आहे.
दरम्यान शेतकरी कृषी कायदे मागे घेतल्यानंतर कंगनाने शेतकरी आंदोलनाविरोधात अपमानजनक वक्तव्य केलं होतं आणि शिख लोकांबाबतही तिने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावरून देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत.