‘सुशांत इतका मोठा स्टार नव्हता की....’; राजदीप सरदेसाई यांच्या वाक्याने संतापली कंगना राणौत, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 01:11 PM2020-08-09T13:11:19+5:302020-08-09T13:11:56+5:30
सुशांत प्रकरणावरून राजदीप सरदेसाई व कंगनात जुंपली
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सध्या वेगवेगळे आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. आता या प्रकरणावरून ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि अभिनेत्री कंगना राणौत या दोघांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळतेय. सुशांत इतका मोठा स्टार नव्हता की, पोलिसांवर तपासासाठी इतका मोठा दबाव आणला जाईल, असे राजदीप कथितरित्या एका चॅनलवरच्या डिबेटमध्ये म्हणाले आणि कंगना भडकली. राजदीप सरदेसाई तुम्हाला लाज वाटायला हवी, असे म्हणत कंगनाने ट्विट केले. तिचे हे ट्विट पाहून राजदीपही संतापले. ‘बकवास मत करो,’ अशा शब्दांत त्यांनी कंगनाला सणसणीत उत्तर दिले.
काय म्हणाले राजदीप
द लल्लन टॉपच्या एका कार्यक्रमात सौरव द्विवेदीच्या प्रश्नांना उत्तर देताना राजदीप सरदेसाई म्हणाले की, ‘मुंबईमध्ये पोलिस कमिशनर असो की बिहारात डीजीपी या सर्वांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. तुम्ही कुठल्या प्रकारची कारवाई करत आहात? कुणाच्या इशाºयावर करत आहात? तुम्ही खरच स्वतंत्र कारवाई करू शकता? प्रामाणिकपणे सांगायचे तर सुशांत सिंग राजपूत इतका मोठा स्टार नव्हता की, पोलिसांवर इतका मोठा दबाब यायला हवा. इतका मोठा दबाव आहे तर का आहे?’
Don’t talk crap. Watch the whole show and not a clip which has been edited to suit the IT cell propaganda. Sushant deserves justice as does EVERY Indian citizen.. what he doesn’t deserve is a media circus and character assassination; incl of people he loved and trusted.
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) August 8, 2020
कंगना म्हणाली,
राजदीप सरदेसाई यांच्या डिबेटच्या क्लिपवर प्रतिक्रिया देत कंगनाच्या वतीने तिच्या टीमने ट्विट केले. ‘तुम्हाला लाज वाटायला हवी राजदीप सरदेसाई. सुशांत सिंग मोठा स्टार नव्हता तर कोण मोठा स्टार आहे? वरूण धवन, रणबीर कपूर की सोनम कपूर? कुणाचे आयुष्य तथाकथित दबावासाठी योग्य आहे, याचे उत्तर द्या,’ असे ट्विट कंगनाने केले.
कंगनाचे हे ट्विट पाहून राजदीपही संतापले. ‘उगाच बरळू नका. संपूर्ण शो पाहा, एक क्लिप नाही. जी आयटी सेलच्या प्रचारासाठी एडिट केली गेली आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकाप्रमाणेच सुशांतलाही न्याय मिळायला हवा. पण म्हणून मीडिया सर्कस आणि चारित्य हनन व्हायला नको. सुशांत लोकांवर प्रेम करायचा. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा,’ असे त्यांनी कंगनाच्या टीमला बजावले.