कोण आहे कंगनावर हात उचलणारी CISF महिला जवान?; शेतकरी कुटुंबाशी आहे संबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 10:50 AM2024-06-07T10:50:08+5:302024-06-07T10:55:55+5:30

Kangana ranaut: चंदीगढ विमानतळावर कंगना बेसावध असतांना एका CISF महिला जवानाने तिच्या कानशिलात लगावली.

kangana-ranaut-slapped-by-kulwinder-kaur-in-chandigarh-airport-who-is-she | कोण आहे कंगनावर हात उचलणारी CISF महिला जवान?; शेतकरी कुटुंबाशी आहे संबंध

कोण आहे कंगनावर हात उचलणारी CISF महिला जवान?; शेतकरी कुटुंबाशी आहे संबंध

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana ranaut) सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. कंगना नुकतीच खासदार झाली असून ती शपथविधीसाठी दिल्लीला निघाली होती. मात्र, चंदीगढ विमानतळावर एका CISF महिला जवानाने तिच्या कानशिलात लगावली. ज्यामुळे सध्या हे प्रकरण चांगलंच गाजत आहे. यामध्येच आता कंगनाच्या कानशिलात लगावणाऱ्या या CISF महिला जवानाची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून तिच्याविषयी नेटकरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर नेटकऱ्यांमध्ये कंगनाला मारणाऱ्या CISF महिला जवानाची चर्चा होतीये. अनेकांनी तिच्यावर टीका केलीये, तर काहींनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. यामध्येच ही महिला जवान नेमकी आहे तरी कोण? तिने कंगनाच्या कानशिलात नेमकी लगावली तरी का? याची चर्चा होतीये.

या कारणामुळे महिला जवानाने उचलला कंगनावर हात

कंगनावर हात उचलणाऱ्या CISF महिला जवानाचं नाव कुलविंदर कौर (kulwinder kaur) असं आहे. गेल्या २ वर्षांपासून ती चंदीगढ विमानतळावर तैनात असून ती शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. मध्यंतरी कंगनाने शेतकरी आंदोलनाविषयी एक भाष्य केलं होतं. दिल्लीतील शेतकरी १००-२०० रुपयांसाठी आंदोलनात सहभागी होतायेत, असं विधान कंगनाने केलं होतं. या आंदोलकांमध्ये कुलविंदरची आईदेखील सहभागी होती. त्यामुळे कंगनाने केलेल्या या विधानाचा राग कुलविंदरच्या मनात होता. ज्यामुळे रागाच्या भरात तिने कंगनाला पाहिल्यावर तिच्यावर हात उचलला.

नेमकी कोण आहे कुलविंदर कौर?

कंगनावर हात उचलणारी CISF महिला जवान कुलविंदर कौर ही ३५ वर्षांची असून गेल्या १५ वर्षांपासून सीआयएसएफमध्ये कार्यरत आहे. कुलविंदर मूळची पंजाबमधील सुलतानपूर लोधी येथील रहिवासी आहे. कुलविंदरचं लग्न झालं असून तिचा नवरादेखील सीआयएसएफ जवान आहे.  कुलविंदर तिच्या पती आणि दोन मुलांसोबत माहोली येथे राहते. तर, तिचा भाऊ शेर सिंग हा शेतकरी नेता असून किसान मजदूर संघर्ष समितीमध्ये संघटना सचिव पदावर आहे.

कुलविंदर कौरवर झाली कारवाई
 

कुलविंदरने कंगनावर हात उचलल्यानंतर तिच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तिला सस्पेंड करण्यात आलं आहे.

Web Title: kangana-ranaut-slapped-by-kulwinder-kaur-in-chandigarh-airport-who-is-she

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.