कंगनाने कृषी कायद्याच्या समर्थकांना म्हटलं 'देशभक्त', ट्विट झालं व्हायरल....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 11:12 AM2020-12-19T11:12:36+5:302020-12-19T11:13:06+5:30

कंगनाचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ट्विटमध्ये कंगनाने कृषी कायद्याचं समर्थन करत असलेल्या लोकांना खरे देशभक्त म्हटलं आहे. 

Kangana Ranaut support farmers bill says they are real Deshbhakt tweet going viral | कंगनाने कृषी कायद्याच्या समर्थकांना म्हटलं 'देशभक्त', ट्विट झालं व्हायरल....

कंगनाने कृषी कायद्याच्या समर्थकांना म्हटलं 'देशभक्त', ट्विट झालं व्हायरल....

googlenewsNext

अभिनेत्री कंगना रणौतचा शेतकरी आंदोलनावर सतत ट्विट करण्याचा सिलसिला सुरूच आहे. ती कधी कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधते ते तर कधी बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधते. आता कंगना रणौतने एक पाऊल पुढे टाकत कृषी कायद्याला देशभक्तीसोबत जोडलं आहे. तिचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ट्विटमध्ये कंगनाने कृषी कायद्याचं समर्थन करत असलेल्या लोकांना खरे देशभक्त म्हटलं आहे. 

ट्विटमध्ये कंगनाने लिहिले की, त्या सर्वांना गुड मॉर्निंग जे अखंड भारतावर प्रेम करतात, ज्यांना या देशाला तोडायचं नाही. केवळ त्या लोकांना गुड मॉर्निंग जे कृषी कायद्याला समजून घेतात आणि त्याचं समर्थन करतात. ते सर्व खरे देशभक्त आहेत. फसवणूक करणाऱ्यांपासून बचाव करा'.

कंगनाचं हे ट्विट आता ट्रेन्ड करू लागलंय. कारण तिने या संवेदनशील मुद्द्यात देशभक्ती घुसवली आहे. अशात सोशल मीडियावरील वाद-विवाद अधिक वाढला आहे.

याआधीही कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट केले आहेत. अनेक ट्विट वादाचा विषय ठरले आहेत. जेव्हा कंगनाने शाहीन बागमधील आज्जीवर वक्तव्य केलं होतं. त्यावेळी तिला सोशल मीडियातून ट्रोलचा सामना करावा लागला होता.

त्या ट्विटनंतरच तिचं दिलजीत दोसांजसोबत ट्विटर वॉर सुरू झालं होतं. गायकाने कंगनावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला होता. कधी तथ्यांच्या आधारावर दोघांनी एकमेकांवर हल्ला केला तर कधी पर्सनल मुदद्यावरूनही हल्ले झाले.
 

Web Title: Kangana Ranaut support farmers bill says they are real Deshbhakt tweet going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.