हेच राहिलं होतं! कंगनाने आमीर खानला डिवचले, स्वत:ची तुलना राणी लक्ष्मीबाई अन् सावरकरांसोबत
By अमित इंगोले | Published: October 23, 2020 12:32 PM2020-10-23T12:32:00+5:302020-10-23T12:35:10+5:30
आता कंगनाने या सर्व प्रकरणावर मौन सोडून ट्विट करत स्वत:ची तुलना स्वातंत्र्य सेनानींसोबत केली आहे. इतकेच नाही तर तिने आमीर खानलाही डिवचले आहे.
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कंगना रणौतच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आधी कंगना विरोधा वांद्रे कोर्टात तक्रार दाखल केली गेली ज्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणी विरोधात धार्मिक तेढ निर्माण करण्याची तक्रार दाखल केली. आता अंधेरी कोर्टात कंगना विरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त विधान केल्याबाबत ही तक्रार आहे. आता कंगनाने या सर्व प्रकरणावर मौन सोडून ट्विट करत स्वत:ची तुलना स्वातंत्र्य सेनानींसोबत केली आहे. इतकेच नाही तर तिने आमीर खानलाही डिवचले आहे.
कंगनाने तिच्या ट्विटमध्ये अभिनेता आमीर खानला टॅग कर त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय. कंगनाने ट्विटमध्ये लिहिले की, 'ज्याप्रमाणे राणी लक्ष्मीबाईचा किल्ला तोडला गेला तसं माझं घर तोडलं, ज्याप्रकारे सावरकरांना विद्रोहासाठी तुरूंगात टाकलं गेलं तसा मलाही तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. इन्टॉलरन्स गॅंगला जाऊन कुणी विचारा त्यांनी कष्ट सहन केलेत या इन्टॉलरंट देशात?'. (कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, न्यायव्यवस्थेवर टीका; वकिलाने केली खासगी तक्रार)
जैसे रानी लक्ष्मीबाई का क़िला तोड़ा था मेरा घर तोड़ दिया, जैसे सावरकर जी को विद्रोह केलिए जेल में डाला गया था मुझे भी जेल भेजने की पूरी कोशिश की जा रही है, इंटॉलरन्स गँग से जाके कोई पूछे कितने कष्ट सहे हैं उन्होंने ने इस इंटॉलरंट देश में? @aamir_khan
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 23, 2020
दरम्यान याआधी कंगना रणौत विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यात सांगण्यात आले होते की, कंगना आणि तिच्या बहिणीने सोशल मीडियावर धार्मिक भावना भडकवत आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीला समन्स पाठवला आहे. मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोल चंदेलला सोमवारी आणि मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
वकिलाने केली तक्रार दाखल
दरम्यान, कनिष्ठ न्यायालयाने गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिल्यावर बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने न्यायव्यवस्थेवर टीका करणारे ट्विट केले. तिच्या या ट्विटविरोधात एका वकिलाने खासगी तक्रार केली आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. ('बहुत याद आती है क-क-क कंगना, जल्द आऊंगी', पुन्हा कंगनाने उडवली मुंबई पोलिसांची खिल्ली)
मुंबईचा उल्लेख ‘पाकव्याप्त काश्मीर’ असा करणाऱ्या कंगनाविरोधात वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार करण्यात आली. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कंगनाने केल्याचा आरोप करण्यात आला. या तक्रारीनंतर दंडाधिकाऱ्यांनी कंगना व तिची बहीण रंगोलीविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलिसांनी दोघींवर गुन्हा नोंदवीत समन्स बजावले. कंगना व तिच्या बहिणीला २६ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
त्यानंतर कंगनाने न्यायव्यवस्थेविरुद्ध द्वेषयुक्त आणि अवमानकारक टिष्ट्वट केले. ‘पप्पू सेना’ असा उल्लेख केला. या तक्रारीवर १० नोव्हेंबर रोजी अंधेरी न्यायालयात सुनावणी होईल. अली खाशीफ खान देशमुख यांनी कंगनाविरुद्ध तक्रार केली आहे.