कंगना राणौत म्हणते, माझ्या आयुष्यालाही धोका; चाहते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 01:17 PM2020-07-24T13:17:01+5:302020-07-24T13:17:15+5:30

कंगना राणौत बॉलिवूडसंदर्भात रोज नवे खुलासे करतेय. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर तर कंगनाने सोशल मीडियावर एक मोहिमच सुरु केली आहे.

kangana ranaut team tweet on life and career is still under big threat | कंगना राणौत म्हणते, माझ्या आयुष्यालाही धोका; चाहते म्हणाले...

कंगना राणौत म्हणते, माझ्या आयुष्यालाही धोका; चाहते म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्देरिया डिसूजाच्या आरोपांना उत्तर देताना कंगनाच्या वतीने तिच्या टिमने एकापाठोपाठ एक अनेक ट्वीट केले आहे.

कंगना राणौत बॉलिवूडसंदर्भात रोज नवे खुलासे करतेय. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर तर कंगनाने सोशल मीडियावर एक मोहिमच सुरु केली आहे. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी तिने कंबर कसलीय.  याप्रकरणी मुंबई पोलिसांसमोर स्वत:चा जबाब नोंदवण्याचीही तिची तयारी आहे. आता सुशांतसाठी आवाज बुलंद करणा-या कंगनाने ट्रोल करणा-यांना एक वेगळाच प्रश्न विचारला आहे. मी का बोलू शकत नाही? असा सवाल तिने केला आहे.
रिया डिसूजाच्या आरोपांना उत्तर देताना कंगनाच्या वतीने तिच्या टिमने एकापाठोपाठ एक अनेक ट्वीट केले आहे.

‘सुशांतच्या मनात काय सुरु होते, हे कंगनाला ठाऊक नाही. पण तिच्या आयुष्यात जे काही घडले, त्याबद्दल ती नक्कीच बोलू शकते. कुठलीही महिला स्वत:साठी लढते तेव्हा ती संपूर्ण जगासाठी लढत असते. केवळ ती जिवंत आहे, म्हणून ती बोलू शकत नाही का? तिलाही मारून टाकले पाहिले आणि मग दुस-यांनी त्यावर बोलले पाहिजे का? कंगनाचे आयुष्य आणि करिअर अजूनही धोक्यात आहे. असे असूनही ती याबद्दल बोलू शकत नाही. का? उत्तर द्या’ असे एक ट्वीटकंगनाच्या टीमने केले.

कंगनाच्या टीमने केलेल्या या पोस्ट सध्या चांगल्याच व्हायरल होत आहेत. अनेक चाहत्यांनी कंगनाला पाठींबा दिला आहे. ‘आम्ही तुझ्या सोबत असताना तुझे करिअर आणि तुझ्या जीवाला काहीही होणार नाही,’ असे लिहित एका युजरने तिला धीर दिला आहे.

Web Title: kangana ranaut team tweet on life and career is still under big threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.