'चंद्रमुखी २'नंतर कंगनाचा 'तेजस' बॉक्स ऑफिसवर आपटणार? पहिल्या दिवशी फक्त 'इतक्या' कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 16:32 IST2023-10-28T16:32:14+5:302023-10-28T16:32:51+5:30
Tejas Box Office Collection : कंगना रणौतच्या 'तेजस' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले?

'चंद्रमुखी २'नंतर कंगनाचा 'तेजस' बॉक्स ऑफिसवर आपटणार? पहिल्या दिवशी फक्त 'इतक्या' कोटींची कमाई
गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या 'तेजस' चित्रपटाची चर्चा सुरू होती. या चित्रपटात कंगना भारतीय हवाई दलातील पायलटच्या भूमिकेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर पाहून 'तेजस'बाबत प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. अखेर २७ ऑक्टोबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदरशित झाला. आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.
कंगना रणौतच्या 'तेजस'कडून चाहत्यांना अपेक्षा होत्या. या चित्रपटातील कंगनाच्या भूमिकेमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. परंतु, हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरला नसल्याचं चित्र आहे. कंगना रणौतच्या 'तेजस' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सुमार कामगिरी केली आहे. तज्ज्ञांच्या मते, हा चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी २-३ कोटींची कमाई करेल अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट २ कोटींचीही कमाई करू शकलेला नाही. कंगनाच्या 'तेजस'ने पहिल्या दिवशी केवळ १.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
'तेजस' चित्रपटात कंगनाबरोबर अंशुल चौहान, वरुण मित्रा, आशिष विद्यार्थी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. 'तेजस'आधी कंगना 'चंद्रमुखी २' आणि 'धाकड' या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पण, हे दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकले नाहीत. आता कंगना 'इमर्जेंन्सी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.