Video : इंदिरा गांधींची भूमिका साकारण्यासाठी कंगना राणौतनं घेतली मेहनत, 'असा' केला मेकओव्हर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:45 IST2025-01-07T11:44:52+5:302025-01-07T11:45:02+5:30
कंगनाच्या मेकओव्हरचा BTS व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Video : इंदिरा गांधींची भूमिका साकारण्यासाठी कंगना राणौतनं घेतली मेहनत, 'असा' केला मेकओव्हर
Kangana Ranaut To Indira Gandhi Makeover : अभिनेत्री कंगना राणौतच्या आगामी 'इमर्जन्सी' (Emergency) सिनेमाची सर्वांना चांगलीच उत्सुकता आहे. हा सिनेमा १७ जानेवारी २०२५ ला जगभरात प्रदर्शित होत आहे. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान कार्यकाळातील आणीबाणीवर आधारित या चित्रपटामध्ये कंगनानं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.
'इमर्जन्सी' सिनेमासाठी कंगनानं पूर्ण मेकओव्हर केला आहे. या सिनेमासाठी कंगनाला प्रोस्थेटिक मेकअप करावा लागला आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी कंगनाच्या मेकओव्हरचा व्हिडीओ इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. ज्यात तिला मेकअप आर्टिस्ट डेविड मालिनोव्स्की हे इंदिरा गांधी (Kangana Ranaut As Indira Gandhi ) यांचा लूक देताना दिसून येत आहेत. प्रोस्थेटिक व मेकअप आर्टिस्ट डेव्हिड मालिनॉस्की हे प्रसिद्ध बाफ्टा आणि ऑस्कर विजेते आहेत. इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना त्यांच्याप्रमाणे दिसण्यासाठी कंगनाने घेतलेले कष्ट पाहून तिचे चाहतेही अवाक झाले आहेत.
विशेष म्हणजे कंगना रणौतनेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'इमर्जन्सी' सिनेमात अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत श्रेयस तळपदे आहे. तर सॅम मानेकशॉ यांच्या भूमिकेत मिलिंद सोमन अगदी चोख दिसतोय. तसेच जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत अनुपम खेर आहेत. खरं तर हा सिनेमा गेल्या वर्षी २०२४ मध्ये रिलीज होणार होता. परंतु सिनेमाविषयी वाद कोर्टात गेल्याने सिनेमाचं प्रदर्शन थांबलं.. काही बदल आणि काही सीन्सला कात्री लावल्यानंतर सेन्सॉर बोर्डानं सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदिल दिला आहे. १३ सीन्सला कात्री लावल्यानंतर हा सिनेमा आता थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.