म्हणून लोक माझा राग करतात...! कंगना राणौतने सांगितले कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 10:23 AM2020-12-18T10:23:42+5:302020-12-18T10:25:08+5:30
त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला मी आवडत नाही...
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणौत सध्या शेतकरी आंदोलनावरील विधानांमुळे ट्रोल होतेय. कंगनाविरोधात बिहारच्या गया कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रदेश महासचिवांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता यावर कंगनाने एका पाठोपाठ दोन पोस्ट केल्या आहेत. लोक माझा इतका रागराग का करतात, यामागचे कारण तिने यात सांगितले आहे.
म्हणून लोक माझा राग करतात...
I have been honest about the film industry so most of them are against me, I opposed reservations most Hindus hate me, during Manikarnika’s release I fought with Karni Sena so Rajputs threatened me as well, I oppose Islamists many Muslims hate me, I fought with Khalistanis... 1/2 pic.twitter.com/2Eu4RENQWm
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 17, 2020
मी फिल्म इंडस्ट्रीप्रति कायम प्रामाणिक राहिले. त्यामुळे अनेक लोक माझ्या विरोधात आहे. मी आरक्षणाचा विरोध केला, म्हणून बहुतांश हिंदू माझा द्वेष करू लागले. ‘मणिकर्णिका’च्या रिलीजवेळी मी करणी सेनेशी वैर घेतले आणि राजपूतांनी मला धमकी दिली. मी मुस्लिम कट्टरपंथियांविरोधात उभी झाले आणि मुस्लिम माझा राग करू लागले. मी खलिस्तानींशी लढतेय तर आता बहुतांश शिख समुदाय माझ्या विरोधात उभा झाला आहे, असे पहिले ट्वीट कंगनाने केले आहे.
मला माझे शुभचिंतक सांगतात...
I have been honest about the film industry so most of them are against me, I opposed reservations most Hindus hate me, during Manikarnika’s release I fought with Karni Sena so Rajputs threatened me as well, I oppose Islamists many Muslims hate me, I fought with Khalistanis... 1/2 pic.twitter.com/2Eu4RENQWm
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 17, 2020
माझे शुभचिंतक मला सांगतात की, अशी मत पळवणारी व्यक्ति कोणत्याही राजकीय पक्षाला मान्य नाही. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला मी आवडत नाही. साहजिकच कोणताही राजकीय पक्ष माझे कौतुक करत नाही. मी हे सगळे काही करते, ते का? याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटते. याचे उत्तर हे आहे की, या जगाच्या पलीकडे एक जग आहे, जिथे माझी अंतरात्मा आहे. तिथे माझे खूप कौतुक होते, असे कंगनाने दुस-या ट्वीटमध्ये लिहिले आहे.
कंगनाविरोधात का दाखल झाली तक्रार?
😂😂😂😂😂 https://t.co/M4v6k5b1cI
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 3, 2020
रालोसपाचे प्रदेश महासचिव विनय कुशवाह यांनी कंगनाविरोधात सिव्हील कोर्टात तक्रार दखल केली आहे. कंगनाने तिच्या ट्वीटर अकाऊंटवर रालोसपाचे पक्ष प्रमुख उपेन्द्र कुशवाह यांच्या फोटोवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी उपेन्द्र कुशवाह यांनीही कंगनावर टीकास्त्र सोडले होते. रालोसपाच्या निवडणूक सभेच्या फोटोचा असा गैरवापर करून कंगना राणौतला राजकीय शाळेत प्रवेश मिळेल का? असा सवाल त्यांनी केला होता.
कंगना रनाैतचे ट्विटर अकाउंट बंद करण्यास ठाकरे सरकारचा विरोध
सिंग इज किंग! कंगनाच्या गंभीर आरोपावर दिलजीतने दिलं उत्तर, गायक म्हणाला - थोडी तरी लाज वाटू दे....