Kangana Ranaut VIDEO: कंगनाने लता मंगेशकरांशी केली स्वतःची तुलना; म्हणाली- 'मी कधीच पैसे घेऊन लग्नात नाचले नाही...'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 03:32 PM2022-12-23T15:32:39+5:302022-12-23T15:33:03+5:30
Kangana Ranaut Video: कंगना रनोटने दिग्गज गायिका आशा भोसले यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट (Kangana Ranaut) तिच्या बिंधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. कंगना इंडस्ट्रीमधील त्या अभिनेत्रींपैकी आहे, ज्या नेहमी आपले म्हणणे स्पष्टपणे जगासमोर मांडतात. तिने अनेकदा बॉलिवूडमधील प्रस्थापितांविरोधातही आवाज उठवला आहे. यातच आता कंगनाने लग्न आणि पार्ट्यांमध्ये डान्स करण्यावरुन आपले म्हणणे मांडले आहे.
कंगनीने इंस्टाग्रामवर दिग्गज गायिका आशा भोसलेंचा (Asha Bhosle) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात आशाजी दिवंगत लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्याबाबत बोलताना दिसत आहेत. आशा भोसले म्हणतात की, लताने कधीच लग्नात गायण केले नाही. तिला कधीच पैशांची लालसाही नव्हती. हाच व्हिडिओ शेअर करत कंगनाने लताजींचे कौतुक केले आणि स्वतःची तुलना त्यांच्यासोबत केली.
कंगनाने आपल्या पोस्टला कॅप्शन दिले, “मी सहमत आहे. मीदेखील कधीच लग्न किंवा खासगी पार्टांमध्ये डान्स केला नाही. मला मोठ्या ऑफर आल्या, पण मी कधीच हे केले नाही. हा व्हिडिओ पाहून आनंद झाला. लताजी खरच खूप प्रेरणादायक आहेत.”