फुकटचा माज मला दाखवू नका...! कंगना राणौत पुन्हा कडाडली!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 01:38 PM2019-01-24T13:38:50+5:302019-01-24T13:40:35+5:30
कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. करणी सेनेने या चित्रपटाला जोरदार विरोध चालवला आहे. एकीकडे करणी सेना आक्रमक झाली असताना दुसरीकडे कंगनाही ठाम आहे. इतकी की, माफी मागण्याची करणी सेनेची मागणी तिने साफ धुडकावून लावली आहे.
कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. करणी सेनेने या चित्रपटाला जोरदार विरोध चालवला आहे. एकीकडे करणी सेना आक्रमक झाली असताना दुसरीकडे कंगनाही ठाम आहे. इतकी की, माफी मागण्याची करणी सेनेची मागणी तिने साफ धुडकावून लावली आहे.
करणी सेनेकडून येणा-या धमक्यांना भीक न घालता कंगनाने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली होती. मी धमक्यांना घाबरणारी नाही. मी सुद्धा राजपूत आहे आणि माझ्या मार्गात आलेल्या एकालाही मी सोडणार नाही,असा धमकीवजा इशारा तिने दिला होता. आता तिने करणी सेनेची माफी मागण्याचा नकार दिला आहे.
‘मी कुणाचीही माफी मागणार नाही. माझी चूक असेपर्यंत मी कुणाचीही माफी मागत नाही. माझ्या चित्रपटात काहीही चुकीचे नाही. याबद्दल आम्ही सर्वांनाच आश्वस्त केले आहे. करणी सेनेनेही या चित्रपटाला सहकार्य केले पाहिजे. फुकटचा माज मला कुणीही दाखवू नये. मी इथे कुणाची माफी मागण्यासाठी नाही,’ असे कंगनाने म्हटले आहे.
करणी सेनेने ‘मणिकर्णिका’च्या रिलीजचा विरोध केला आहे. करणी सेनेच्या महाराष्ट्र शाखेने या चित्रपटावर आक्षेप नोंदवत निर्मात्यांना पत्र पाठवले आहे. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात एका गाण्यात लक्ष्मीबाईंना नृत्य करताना दाखवले गेले आहे. हे सभ्यतेला धरून नसल्याचा करणी सेनेचा आरोप आहे. चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य दाखवली गेलीच तर मात्र निर्मात्यांना याचे वाईट परिणाम भोगावे लागतील,असा इशारा या पत्रात दिला गेला आहे. इतकेच नाही तर या वादादरम्यान कंगनालाही करणी सेनेकडून आपल्याला धमक्या येत असल्याचे कळतेय.