'आत्ताच कुठे जणू आम्ही माकाडातून माणूस झालोत..', कंगना राणौतने आंतरराष्ट्रीय मीडियावर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 12:09 PM2021-05-01T12:09:51+5:302021-05-01T12:10:37+5:30
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती आंतरराष्ट्रीय मीडिया आणि देशातील विचारवंतावर टीका करताना दिसते आहे.
देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. आतापर्यंत अनेकजणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड आणि कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. भारतातील वाढत्या महामारीला देशासोबत जगभरातील सर्व देशांच्या वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेल्समध्ये दाखवले जात आहे. ज्यावर अभिनेत्री कंगना राणौतने आक्षेप नोंदवला आहे.
कंगना राणौतने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती आंतरराष्ट्रीय मीडिया आणि भारतातील विचारवंतांवर निशाणा साधताना दिसते आहे. या व्हिडीओत ती म्हणाली की, कोरोनाशिवाय बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्यांची मला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे. कधी तुम्ही पाहिले आहे भारतात कोणती आपत्ती येते, संकट येते तेव्हा एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली जाते आणि सर्व देश एकत्र येतात.
Please watch warning to all those who are going to their foreign daddies to cry about India.... your time is up .. pic.twitter.com/pW1lwzip8R
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 30, 2021
कंगना राणौतने पुढे सांगितले की, भारताला असे दाखवले जाते की जसे तुम्ही लोक तर आता आता माकडाचे माणूस बनले आहात. चार गोऱ्यांशिवाय जोपर्यंत ते येऊन गुलाम नाही बनवत तोपर्यंत तुम्हाला ते सांगणार नाहीत काय करायचे, कसे उठायचे, बसायचे, खायचे आहे. तुम्हाला तर माहित नाही की लोकशाही काय आहे. तुम्हाला कोणाचे ऐकले पाहिजे. आपल्याकडे बुद्धीमत्ता नाही. तर ते आपल्याला सांगणार काय करायचे आहे. यांचे चॅनेल हे बुद्धिजीवींनी स्थापन केलंय.
कंगना पुढे म्हणाली की, तुम्ही सांगा टाइमच्या मासिकावर मृतदेहांचे फोटो येतात. हे फोटो बेस्ट सेलिंग आहेत. बरखा दत्तजी जातात सीएनएनवर. रडतात की आम्ही लोक माकड आहोत.राणा अय्यूब आणि अरुंधती रॉय हे सर्व भारतीय आहेत. हे लोक त्यांचे सोर्स बनतात. जे जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलीन करतात.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, तिचा 'थलायवी' चित्रपट २३ एप्रिल रोजी रिलीज होणार होता. मात्र कोरोनाच्या संकटामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. हा चित्रपट तमिळनाडूच्या मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारीत आहे. त्याचप्रमाणे 'तेजस' आणि 'धाकड' या सिनेमातही ती काम करत आहे.