ऑफिस अन् हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगनाचा संजय राऊतांवर निशाणा; म्हणाली...
By कुणाल गवाणकर | Published: October 25, 2020 01:45 PM2020-10-25T13:45:10+5:302020-10-25T13:47:10+5:30
Kangana Ranaut Sanjay Raut: कंगना आणि संजय राऊत यांच्यात पुन्हा जुंपण्याची शक्यता
मुंबई: अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातलं वाकयुद्ध गेल्या काही दिवसांपासून थांबलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना प्रकरण आपल्यासाठी संपल्याचं म्हटलं होतं. मात्र आता कंगनानं राऊत यांनी पुन्हा एकदा डिवचलं आहे. कंगनानं दसऱ्यानिमित्त तिच्या मुंबईतल्या कार्यालयाचा फोटो ट्विट करत राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता राऊत कंगनाला प्रत्युत्तर देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
"मुख्यमंत्री ठाकरे कोरोना लसीचं राजकारण करण्याइतके कोत्या मनाचे नाहीत"
काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना राणौत यांच्यात जुंपली होती. यानंतर आता दसऱ्याच्या शुभेच्छा देताना कंगनानं संजय राऊतांना लक्ष्य केलं आहे. कंगनानं ट्विटरवर हनुमानाच्या मूर्तीचा आणि मुंबईतल्या कार्यालयाचा फोटो शेअर केला आहे. 'माझी तुटलेली स्वप्नं तुमच्या चेहऱ्यासमोर हसत आहेत संजय राऊत. पप्पू सेना माझं घर तोडू शकते. पण माझ्या आत्म्यावर घाला घालू शकत नाही. बंगला क्रमांक ५ आज सत्याचा असत्यावर विजय साजरा करत आहे,' असं म्हणत कंगनानं दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवार अन् राज ठाकरे पुन्हा एकाच मंचावर येणार; संजय राऊतही सामील होणार
My broken dream smiling in your face Sanjay Raut, Pappu sena could break my house but not my spirit, Banglow number 5 is celebrating the triumph of good over evil today #HappyDussehrapic.twitter.com/2i4OnxiPeS
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 25, 2020
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांनी कंगनावर टीका केलेली नाही. कंगनाच्या मुंबईतल्या कार्यालयावर महापालिकेनं कारवाई केल्यावर कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीवर घणाघाती टीका सुरू केली. मात्र संजय राऊत यांनी हा विषय संपल्याचं म्हटलं. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून सगळ्या गोष्टींवर बोलेन, असं काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे आज होऊ घातलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे कंगनावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.