'...तर सूर्य उगवणार नाही', सद्गुरु यांच्यावरील ब्रेन सर्जरीविषयी समजताच कंगना रणौत चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 11:32 AM2024-03-21T11:32:11+5:302024-03-21T11:33:22+5:30
कंगना म्हणाली, 'आज जेव्हा मी सद्गुरुंना आयसीयूत बघितलं तेव्हा मला जाणीव झाली की...'
आध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव ज्यांना संपूर्ण जग सद्गुरु (Sadhguru) नावाने ओळखतं त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सद्गुरुंवर तातडीने ब्रेन सर्जरी करावी लागली. मेंदूत Internal bleeding झाल्याने त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया केली गेली. यानंतर सर्वांनीच त्यांच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली. सर्जरीनंतर सद्गुरु यांनी स्वत: रुग्णालयातील व्हिडिओ शेअर करत तब्येतीविषयी माहिती दिली. नुकतंच अभिनेत्री कंगना रणौतने त्यांच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली असून प्रतिक्रिया दिली आहे.
कंगना रणौतने अनेकदा सद्गुरुंना भेटल्याचा आणि त्यांच्या कोइंम्बतुर येथील ईशा फाऊंडेशनला भेट दिल्याचा उल्लेख केला आहे. काल त्यांच्यावर ब्रेन सर्जरी झाल्याचं समजताच कंगना ट्वीट करत म्हणाली, 'आज जेव्हा मी सद्गुरुंना आयसीयूत बघितलं तेव्हा मला जाणीव झाली की ते सुद्धा आपल्यासारखेच हाडे, रक्त आणि मांसाने बनलेले आहेत. मला वाटलं की देवच कोसळला आहे, पृथ्वी हलली आहे, आकाशाने त्याग केला आहे, माझं डोकं गरगरत आहे, मला या अस्तित्वारच विश्वास बसत नाहीए. पण अचानक मी कोसळले, आज लाखो लोकांनाही हेच दु:ख वाटत असेल. मला हे दु:ख तुमच्यासर्वांसोबत शेअर करायचं आहे. मी एकटी ते सहन करु शकत नाही.'
Today when I saw Sadhguru ji lay on ICU bed I was suddenly hit by the mortal nature of his existence, before this it never occurred to me that he is bones, blood, flesh just like us. I felt God has collapsed, I felt earth has shifted, sky has abandoned me, I feel my head…
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 20, 2024
कंगना पुढे लिहिते,'त्यांना बरं व्हावंच लागेल नाहीतर सूर्य उगवणार नाही , पृथ्वी हलणार नाही. हा क्षण असाच निर्जीव थांबलेला आहे.'
सद्गुरु यांच्यावर इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. सर्जरीनंतर रुग्णालयातील बेडवरुनच व्हिडिओ शेअर कर म्हणाले, 'अपोलोमधील डॉक्टरांनी माझ्या मेंदूमध्ये काहीतरी शोधण्यासाठी डोकं कापलं पण त्यांना काहीच नाही मिळालं. ते पूर्णपणे रिकामं आहे. म्हणूनच त्यांनी हार मानली आणि परत ठीक केलं. मी इथे दिल्लीत आहे, डोक्यावर पट्टी बांधलेली आहे पण मेंदूला काहीही झालेलं नाही.'
An Update from Sadhguru... https://t.co/ouy3vwypsepic.twitter.com/yg5tYXP1Yo
— Sadhguru (@SadhguruJV) March 20, 2024
अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांनी माहिती दिली की चार आठवड्यांपासून त्यांना डोकेदुखीचा त्रास होत होता. मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांनी त्यांची सर्व कामं केली, मीटिंग्स केल्या. मात्र १७ मार्चला त्यांना अॅडमिट केलं तेव्हा त्यांच्या मेंदूत जीवघेणा रक्तस्त्राव होत असल्याचं कळलं आणि काल त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.