कंगना राणौतने ‘नेपोटिझम’वर ओपन लेटर लिहित सैफ अली खानला पाजले डोस!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2017 10:44 AM2017-07-22T10:44:18+5:302017-07-22T16:14:45+5:30

गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये नेपोटिझम अर्थात ‘भाईभतीजा’वाद या मुद्यावरून घमासान रंगताना दिसत आहे. यावर बरेच काही बोलले जात असल्याने ...

Kangana Ranaut writes 'Opening Letter on Napotype' Saif Ali Khan Pajale Dos! | कंगना राणौतने ‘नेपोटिझम’वर ओपन लेटर लिहित सैफ अली खानला पाजले डोस!

कंगना राणौतने ‘नेपोटिझम’वर ओपन लेटर लिहित सैफ अली खानला पाजले डोस!

googlenewsNext
ल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये नेपोटिझम अर्थात ‘भाईभतीजा’वाद या मुद्यावरून घमासान रंगताना दिसत आहे. यावर बरेच काही बोलले जात असल्याने कलाकारांमधील मतभेद टोकाला पोहोचले आहेत. या वादात दररोज एक तरी कलाकार कोणाच्या ना कोणाच्या समर्थनार्थ उडी घेत असल्याने सध्या बॉलिवूडमध्ये या मुद्यावरून दोन गट पडताना दिसत आहेत. त्यातच नुकत्याच संपन्न झालेल्या ‘आयफा २०१७’ मध्ये निर्माता करण जोहर, सैफ अली खान आणि वरुण धवनने या वादाला अशी काही ठिणगी लावली की, त्याच्या ज्वाला अजुनही पेटत आहेत. अवॉर्ड सोहळ्यादरम्यान चेष्टा मस्करीत वरुण, करण आणि सैफने अभिनेत्री कंगना राणौतला डिवचताना या मुद्यावरून तिची खिल्ली उडविली. मात्र आता हा वाद पेटला असून कंगनानेही जसास तसे उत्तर देण्याचा धडाका लावला आहे. 

आयफा सोहळ्यानंतर अगोदर वरुण आणि नंतर सैफने या नेपोटिझमच्या मुद्यावर त्यांचे मत व्यक्त केले. वरुण कंगनाची जाहिरपणे माफी मागताना यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पुढे सैफनेही ओपन लेटर लिहून याविषयी आपले मत मांडले. या लेटरमध्ये सैफने लिहिले की, ‘नेपोटिझम या मुद्यावर केवळ बॉलिवूड स्टार्सला दोष देणे चुकीचे आहे.’ आता कंगनानेही सैफच्या ओपन लेटरला उत्तर देताना एक ओपन लेटर लिहिले आहे. ज्यामध्ये तिने सैफच्या प्रत्येक मताचे खंडन करताना खास तिच्या शैलीत सैफला उत्तर दिले आहे. लेटरच्या सुरुवात करतानाच कंगनाने स्पष्ट केले की, ही कुठल्याही प्रकारची लढाई नाही. हे केवळ विचारांची देवाण-घेवाण आहे. 



कंगनाने तिच्या ओपन लेटरमध्ये म्हटले की, सैफचे ओपन लेटर वाचून खूपच दु:ख झाले, असेच दु:ख मला करण जोहरचा ब्लॉग वाचून झाले होते. कंगनाने सैफकडून उपस्थित केलेल्या जेनेटिकच्या मुद्यावर भर देताना म्हटले की, जर जेनेटिकच्या पद्धतीनेच सगळ्याच गोष्टी घडल्या असता, तर आज मी एक अभिनेत्री नव्हे तर शेतकरी असती. एक्सेलेंसी एका जनरेशनकडून दुसºया जेनरेशनमध्ये जाऊ शकत नाही. जर आपल्यातील गुण जसास तसे आपण आपल्या मुलांना देऊ शकलो असतो तर कदाचित आपल्याकडे आज कित्येक आइनस्टाइन, द विंची, शेक्सीपियर, विवेकानंद, स्टीफेंस हॉकिन्ससारखे महान व्यक्तीमत्त्व असते. 

कंगनाचे हे ओपन लेटर सर्वच अर्थाने परिपक्व असून, सैफला नक्कीच झोंबणारे आहे. आता सैफ यावर कशा पद्धतीने रिअ‍ॅक्ट होतो हे बघणे मजेशीर ठरेल. दरम्यान नेपोटिझमचा वाद चिघळत असल्याने आगामी काळात यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. 

Web Title: Kangana Ranaut writes 'Opening Letter on Napotype' Saif Ali Khan Pajale Dos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.