कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटावरुन मोठा वाद, तातडीने चित्रपट प्रदर्शित करण्यास हायकोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 09:46 AM2024-09-05T09:46:06+5:302024-09-05T09:46:06+5:30

'इमर्जन्सी' सिनेमा ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. पण, सेन्सॉर प्रमाणपत्रच नसल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीय.

Kangana Ranaut's Emergency Movie Controversy Bombay High Court rejects plea to order certification | कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटावरुन मोठा वाद, तातडीने चित्रपट प्रदर्शित करण्यास हायकोर्टाचा नकार

कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटावरुन मोठा वाद, तातडीने चित्रपट प्रदर्शित करण्यास हायकोर्टाचा नकार

Kangana Ranaut Emergency Movie Controversy : कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. अभिनेत्रीचा हा सिनेमा रिलीज आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'इमर्जन्सी' सिनेमा ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. पण, सेन्सॉर प्रमाणपत्रच नसल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीय. सिनेमाचा हा वाद थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहचला आहे. 

शिरोमणी अकाली दलसह शीख समुदायाच्या अनेक संघटनांनी सिनेमावर आक्षेप घेतला होता. म्हणून 'इमर्जन्सी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर जबलपूर उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. यावर सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला प्रमाणपत्र दिलं नाही. अखेर निर्मात्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत सेन्सॉर प्रमाणपत्राची मागणी केली आहे. सेन्सॉर प्रमाणपत्र मिळत नसल्याने निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर न्या. बी. पी. कुलाबावाला व न्या. फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली आहे. 


 मुंबई उच्च न्यायालयाने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला (सीबीएफसी) फटकारलं. "चित्रपट न पाहताच चित्रपट आक्षेपार्ह आहे हे काही गटांना कसे कळते, हे आम्हाला समजत नाही", असं मत न्यायालयाने नोंदवलं. पण, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कंगनाला तत्काळ दिलासा दिला नाही. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारे आदेश आम्ही देऊ शकत नाही, असं न्यायालयाने म्हटलं.  यावेळी न्यायालयानं सेन्सॉर बोर्डला कालमर्यादा घालून दिली आहे.

शीख समुदायातील संबंधित गटांच्या आक्षेप घेणाऱ्या अर्जांवर ६ सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालायने दिले आहेत. तसेच सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी प्रमाणपत्र देण्याविषयी १८ सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्यावा, असा आदेश खंडपीठानं सेन्सॉर बॉर्डला दिला. तसंच पुढील सुनावणी १९ सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे. आता सिनेमाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळणार का आणि तो कधी रिलीज होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
 

Web Title: Kangana Ranaut's Emergency Movie Controversy Bombay High Court rejects plea to order certification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.