कंगना राणौतचा ‘तो’ फोटो व्हायरल; पहलाज निहलानी देतील का उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 01:46 PM2019-04-03T13:46:35+5:302019-04-03T13:47:00+5:30

स्ट्रगलच्या काळात पहलाज निहलानी यांनी मला अंर्तवस्त्राशिवाय फोटोशूट करायला सांगितले होते, असा खुलासा करून कंगना राणौतने नुकतीच खळबळ माजवली होती. तिच्या या खुलाशावर सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पंकज निहलानी जाम बिथरले होते.

kangana ranauts semi nude picture is going viral on social media | कंगना राणौतचा ‘तो’ फोटो व्हायरल; पहलाज निहलानी देतील का उत्तर?

कंगना राणौतचा ‘तो’ फोटो व्हायरल; पहलाज निहलानी देतील का उत्तर?

googlenewsNext
ठळक मुद्दे हा फोटो फेक आहे की, खरोखरच पहलाज यांनी आपल्या चित्रपटासाठी केलेल्या फोटोशूटचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्ट्रगलच्या काळात पहलाज निहलानी यांनी एक सॉफ्ट पोर्न फिल्म आॅफर केली होती. मला अंर्तवस्त्राशिवाय फोटोशूट करायला सांगितले होते, असा खुलासा करून कंगना राणौतने नुकतीच खळबळ माजवली होती.  तिच्या या खुलाशावर सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पंकज निहलानी जाम बिथरले होते. सगळ्यांशी पंगा घे, माझ्याशी नको, अशी तंबीही त्यांनी कंगनाला दिली होती. 
‘मी चित्रपटांच्या फोटोशूटसाठी दीड कोटी रूपये खर्च केले होते. कंगनाने फोटोशूट केले. माझ्या याच फोटोशूटमुे महेश भट यांचा ‘गँगस्टर’ हा सिनेमा तिला मिळाला. ‘गँगस्टर’ मिळाल्यानंतर लगेच तिने माझा चित्रपट करण्यास टाळाटाळ सुरु केली. मला आधी ‘गँगस्टर’ करू द्या, अशा विनवण्या तिने  केल्या. कंगनाने माझ्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नये. कारण तिने असे केले तर माझ्याकडे तिच्याशी खेळण्यासाठी बरेच काही आहे,’ असे काय काय पहलाज निहलानी म्हणाले होते. त्यांच्या या जळजळीत प्रतिक्रियेनंतर हे प्रकरण शांत झाले असेच सर्वांना वाटले होते. पण झाले उलटेच. कंगनाचा एक सेमी न्यूड फोटो व्हायरल झाला आणि या प्रकरणाला पुन्हा हवा मिळाली.

होय, सध्या वा-याच्या वेगाने व्हायरल होत असलेना कंगनाचा हा सेमी न्यूड फोटो पहलाज यांच्या चित्रपटासाठी केलेल्या फोटोशूटचाच असल्याचा दावा तूर्तास केला जातोय. या फोटोत पहलाज यांच्या चित्रपटाचे नावही स्पष्ट दिसतेय. हा फोटो फेक आहे की, खरोखरच पहलाज यांनी आपल्या चित्रपटासाठी केलेल्या फोटोशूटचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण या फोटोने एका नव्या वादाला जन्म दिलाय, इतके मात्र नक्की.

काय म्हणाली होती कंगना
पहलाज निहलानी यांनी मला एका चित्रपटाची आॅफर दिली होती. या चित्रपटाचे नाव ‘आय लव्ह यू बॉस’ असे होते. या चित्रपटासाठी एक फोटोशूट होणार होते. मला त्यांनी रोब म्हणजेच ट्रान्सपरंट गाऊन घालायला दिला होता. पण त्यासोबत अंर्तवस्त्र नव्हती. मी या चित्रपटात एका मुलीची भूमिका साकारणार होती, जिच्या मनात तिच्या बॉसविषयी लैंगिक भावना आहेत. ती एक सॉफ्ट पोर्न भूमिका होती असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी हे सगळे ऐकूनच मी हे काम करू शकत नाही असे सांगितले आणि तिथून अक्षरश: पळत काढला. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्यानंतर मी काही दिवस सगळ्यांपासून लपून राहात होते. मी माझा नंबर देखील बदलला होता, असे कंगनाने म्हटले होते.

Web Title: kangana ranauts semi nude picture is going viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.