कंगना राणौतच्या बहिणीने ओतले आगीत तेल! ऋचा चड्ढाला म्हटले ‘जॉबलेस अॅक्ट्रेस’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 12:29 PM2019-05-13T12:29:44+5:302019-05-13T12:30:27+5:30
कंगना राणौतच्या वतीने मैदानात उतरलेली तिची बहिण रंगोली सध्या एकापाठोपाठ एक अनेकांवर बेछूट आरोप करत सुटलीय. काही दिवसांपासून रणबीर कपूर, आलिया भट, करण जोहर, हृतिक रोशन अशा सगळ्यांना रंगोलीने लक्ष्य केले. रंगोलीचे ताजे लक्ष्य ठरली तर अभिनेत्री ऋचा चड्ढा.
कंगना राणौतच्या वतीने मैदानात उतरलेली तिची बहिण रंगोली सध्या एकापाठोपाठ एक अनेकांवर बेछूट आरोप करत सुटलीय. काही दिवसांपासून रणबीर कपूर, आलिया भट, करण जोहर, हृतिक रोशन अशा सगळ्यांना रंगोलीने लक्ष्य केले. रंगोलीचे ताजे लक्ष्य ठरली तर अभिनेत्री ऋचा चड्ढा.
I hear a lot of people like @RichaChadha comment about Kangana’s outspokenness, they often insist they choose not to have public war of words. My question is do they have a choice? Are they truly autonomous? .... (contd.) https://t.co/b0l8dWKrTA
— Rangoli Chandel (@Rangoli_A) May 12, 2019
ऋचा कंगनाला उद्देशून बोलली आणि तशी ती रंगोलीच्या हिटलिस्टवर आली. ‘मी सरसकट सगळ्यांसोबत शाब्दिक भांडणावर विश्वास ठेवत नाही. एखाद्या व्यक्तीबाबत तक्रार असेल तर मी त्यांच्या समोर जाऊन बोलेन,’असे ऋचा म्हणाली. ऋचाच्या या वक्तव्यावर कंगनाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण रंगोलीला मात्र मिरच्या झोंबल्या. तिने नेहमीप्रमाणे एकापाठोपाठ एक असे अनेक टिष्ट्वट करत, ऋचाला लक्ष्य केले. केवळ इतकेच नाही तर ऋचाला ‘बेरोजगार अभिनेत्री’ म्हणत तिने तिच्यावर टीका केली.
(Contd)...Can they function if bollywood biggies black list them? Can they create content and survive on their own? Do they have that competence? Can they survive opposition’s counter attacks and bring about the much needed change?....(contd)
— Rangoli Chandel (@Rangoli_A) May 12, 2019
..(contd) Please understand Kangana slogged for 14 years to earn her freedom, she never spoke the way she does now cause in 14 years she build herself in a way that she will survive even if the whole industry is against her...(contd)— Rangoli Chandel (@Rangoli_A) May 12, 2019
....(contd) so her timing of speaking out was also decided a decade ago. Please know if there is a flame burning in the rain there is a reason behind that its not a coincidence. And here are some jobless actors, movie mafia ass lickers....(contd)— Rangoli Chandel (@Rangoli_A) May 12, 2019
‘ मी ऐकले की, ऋचा चड्ढासारख्या अनेकांना कंगनाचे स्पष्ट बोलणे खटकते. त्यांच्यामते कंगनाने सार्वजनिक ठिकाणी बोलणे चुकीचे आहे. पण मी त्यांना विचारू इच्छिते की, तुमच्याकडे आणखी कोणता पर्याय आहे का ? तुम्ही स्वत:च्या हिंमतीवर आजपर्यंत काही कमावले आहे का?’ असे रंगोलीने ऋचाला लक्ष्य करताना लिहिले.
.....(contd) giving her gyan that even though they can but they don’t indulge in public fights. Darling the truth is if you could, you would 🙂.. So please take a seat🙏
— Rangoli Chandel (@Rangoli_A) May 12, 2019
‘बॉलिवूडमधील अनेक कलाकार या लढाईत हारले पण कंगना ही लढाई जिंकली. कारण तिने वयाच्या १४ व्या वर्षांपासून स्वत:च्या मेहनतीने स्वत:ला तयार केले, असेही रंगोलीने एका ट्वीटमध्ये म्हटले. कंगना सध्या तिच्या ‘मेंटल है क्या’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तिचा ‘पंगा’ सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.