कंगना राणौतची बहीण रंगोली नरेंद्र मोदींच्या भाषणावर झाली नाराज, केले हे ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 07:45 PM2020-04-14T19:45:02+5:302020-04-14T19:45:53+5:30
रंगोलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाल्यानंतर या भाषणावर ती नाराज असल्याचे सांगत एक ट्वीट केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल आणि वाद यांचे जवळचे नाते आहे. ट्विटरवर प्रचंड अॅक्टिव्ह असलेली रंगोली तिच्या ट्विटद्वारे अनेकदा वाद ओढवून घेते. अनेकदा ट्रोल होते. पण कुणाला जुमानेल ती रंगोली कसली. आता रंगोलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाल्यानंतर या भाषणावर ती नाराज असल्याचे सांगत एक ट्वीट केले आहे.
Lockdown will be extended across India till May 3: PM Narendra Modi pic.twitter.com/QwxKm1pwBP
— ANI (@ANI) April 14, 2020
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन वाढवण्यात येत असल्याची आज घोषणा केली. त्यामुळे आता ३ मेपर्यंत देशात लॉकडाऊन असेल. मोदींनी देशवासीयांशी संवाद साधताना लॉकडाऊन वाढवत असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी देशवासीयांच्या संयमांचं कौतुक केलं. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात बऱ्याच प्रमाणात मदत झाल्याचं ते म्हणाले. २१ दिवसांच्या लॉकडाऊननंतर काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात येतील, असा अंदाज वर्तवण्यात होता. मात्र मोदींनी सगळ्यांनाच जोरदार धक्का देत पुढील आठवडाभर निर्बंध कठोर केले जाणार असल्याचं सांगितलं. पण मोदींच्या या भाषणानंतर रंगोलीने एक ट्वीट केले आहे.
Glad Modi extended the lock down, I also liked the decision about the states where it’s increasing will remain shut while others which become Corona free can start to operate, good jo karega woh Bharega, but the speech was too short, wish Modi ji would motivate us little more.
— Rangoli Chandel (@Rangoli_A) April 14, 2020
रंगोलीने तिच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, मोदीजींनी लॉकडाऊन वाढवला याचा आनंद होत आहे. कोरोनाचे रुग्ण अधिक असलेल्या राज्यात काम सुरू होणार नाही. पण ज्या राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत त्या राज्यांमध्ये काम सुरू होईल हा त्यांचा निर्णय देखील मला आवडला. पण मोदी यांचे भाषण खूपच छोटे होते. त्यांनी त्यांच्या भाषणाद्वारे आमच्यासारख्या लोकांना अधिक प्रेरणा देण्याची गरज होती.
लॉकडाऊन वाढल्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मजुर चिंताग्रस्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या रंगोलीच्या ट्वीटची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.