Thalaivi Movie : जयललिता यांच्या रूपात अशी दिसली कंगणा राणौत, पाहा तिचे एक से बढकर एक लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 13:57 IST2020-02-24T13:52:49+5:302020-02-24T13:57:41+5:30
Thalaivi Movie : चित्रपटसृष्टीत आजवर बरेच बायोपिक आलेत. प्रत्येक चित्रपटाला रसिकांची दाद मिळाली आहे. मात्र बायोपिक चित्रपटांचा रिलीजपर्यंतचा प्रवास सोपा नसतो.

Thalaivi Movie : जयललिता यांच्या रूपात अशी दिसली कंगणा राणौत, पाहा तिचे एक से बढकर एक लूक
चित्रपटसृष्टीत विविध राजकीय नेत्यांच्या जीवनावरील बायोपिक रुपेरी पडद्यावर येण्याची जणू काही स्पर्धाच सुरू झाली आहे की काय असं चित्र पाहायला मिळत आहे.वंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ठाकरे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील द एक्सिडेंटल प्राइमिनिस्टर अशा चित्रपटांची जोरदार चर्चा ऐकायला मिळाली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवनावरील चित्रपटही लवकरच रुपेरी पडद्यावर येणार असल्याच्या चर्चा आहेत.
यात आता दिवंगत पूर्व तमिलनाडुच्या मुख्यमंत्री जे जयललिता जयललिता यांच्यावरील 'थलाइवी' हा बायोपिक लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सिनेमाचे शूटिंग सुरू असून बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याच सिनेमातील कंगणाचा एक लूक समोर आला आहे. यात साक्षात जयललिता भासावी असा तिचा लूक आहे.
चित्रपटसृष्टीत आजवर बरेच बायोपिक आलेत. प्रत्येक चित्रपटाला रसिकांची दाद मिळाली आहे. मात्र बायोपिक चित्रपटांचा रिलीजपर्यंतचा प्रवास सोपा नसतो. कारण ज्या व्यक्तीवपील चित्रपट असतो त्याच्या प्रतिमेला धक्का लागू नये अशी प्रत्येकाची भावना असते.म्हणूनच या सिनेमाची टीमनेही कोणतीही कमी राहू नये यासाठी मेहनत घेत आहे. जयललिता यांची आज जयंती आहे. याच निमित्ताने कंगणाचा लूक प्रदर्शित करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “थलाइवी” जून २०२०मध्ये तामिळ, हिंदी आणि तेलुगु भाषेत सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.