​कंगना राणौत लाटू पाहतेय ‘सिमरन’च्या लेखकाचे श्रेय? वाचा काय आहे प्रकरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 09:24 AM2017-05-18T09:24:03+5:302017-05-18T14:54:03+5:30

कंगणा राणौत आणि वाद यांचे जुने नाते आहे. सध्या ती अशाच काहीशा कारणाने चर्चेत आहे. अर्थात हा वाद नाही. ...

Kangana Ranout Latu is the author of Simran's credit? Read what the episode! | ​कंगना राणौत लाटू पाहतेय ‘सिमरन’च्या लेखकाचे श्रेय? वाचा काय आहे प्रकरण!

​कंगना राणौत लाटू पाहतेय ‘सिमरन’च्या लेखकाचे श्रेय? वाचा काय आहे प्रकरण!

googlenewsNext
गणा राणौत आणि वाद यांचे जुने नाते आहे. सध्या ती अशाच काहीशा कारणाने चर्चेत आहे. अर्थात हा वाद नाही. पण फुकटचे श्रेय लाटण्याच्या नादात कंगनाचे पितळ उघडे पडले आहे. कंगना व अपूर्व असरानी यांच्यातील मतभेद यानिमित्ताने चव्हाट्यावर आले आहेत. आता हा अपूर्व असरानी कोण? तर कंगनाचा आगामी सिनेमा ‘सिमरन’चा पटकथालेखक़
हे मतभेद सुरु होतात ते, ‘सिमरन’पासून. या चित्रपटाची कथा अपूर्वने लिहिली आहे. ‘सिमरन’चे दिग्दर्शक हंसल मेहता आणि अपूर्व अनेक वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. आत्ताआत्तापर्यंत दोघांमध्ये सगळे काही आॅलवेल होते. पण अचानक चित्रपटाच्या कथालेखनाचे श्रेय कंगनाला विभागून दिले जाऊ लागले आणि अपूर्व यांचे माथे ठणकले. कंगना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. पटकथेचे सगळे श्रेय कंगना लाटत असलेली पाहून अपूर्व संतापला आहे आणि ते साहजिकही आहे. कारण अपूर्वचे मानाल तर त्याने या कथेसाठी त्याच्या आयुष्याची दोन वर्षे दिली आहेत. अपूर्व यावर खरमरीत बोलला आहे.



ALSO READ :  कंगना राणौतच्या ‘सिमरन’ची पहा पहिली झलक!

चुकीच्या गोष्टींविरूद्ध लढणा-या कंगनाला मी नेहमीच पाठींबा दिला आहे. पण ‘सिमरन’च्या पोस्टरमध्ये रायटरच्या नावात कंगनाचे नाव माझ्या नावाच्या आधी येते, हे कदापि योग्य नाही. हा कुठल्याही लेखकाचा अपमान आहे. माझा राग केवळ यासाठीच नाही तर आणखी एका वेगळ्या कारणासाठीही आहे. कंगना प्रत्येक मुलाखतीत, ‘सिमरन’ची पटकथा तिने लिहिलीय, हे वाढवून सांगते आहे. हंसल मेहता माझ्याकडे आले. तेव्हा त्यांच्याकडे ‘सिमरन’ची केवळ एक लाईन स्टोरी होती. एकदम डार्क अन् थ्रीलर. मी या कहानीवर काम केले आणि मग एक लाईट, फन फिल्म तयार झाली, असे कंगना सांगत सुटलीय. कंगनाचे हे शब्द खोटे आहेत. हा माझा वा माझ्या कष्टांचा अपमान आहे.  हंसल मेहता यांनी मला एक आर्टिकल पाठवले होते. जी अमेरिकन मुलीची कथा होती. मी त्यावर काम सुरु केले. मग मी हंसल मेहतासोबत करार साईन केला. माझी स्क्रिप्ट पूर्णपणे तयार होती. हंसल यांना ती खूप आवडली. ते मला कंगनाकडे घेऊन गेलेत. कंगनालाही स्क्रिप्ट खूप आवडली व तिने या चित्रपटासाठी होकार दिला. यानंतर तर मी या कथेत आणखी जीव ओतण्याचे ठरवले. अमेरिकेत गेलो. रिसर्च केला. स्क्रिप्टवर आणखी काम केले. मग शूटींग सुरु झाले.चित्रपट तयार झाला. सगळे डायलॉग्स माझे होते. अर्थात काही संवाद कंगनाने आपल्या अंदाजात म्हटलेले होते. एकदिवस अचानक हंसल मेहता यांनी मला बोलवले आणि कंगना को-राईटरचे क्रेडिट मागत असल्याचे मला विचारले. मी स्पष्ट नकार दिला. यानंतर दोन महिने हंसल मेहता मला समजावत होते. अखेर मी यास राजी झालो. कारण असे केले नसते तर त्यांचा चित्रपट फसला असता. पण कंगनाचे नाव माझ्या नावाच्या वर पाहून मला धक्का बसला. मीच संपूर्ण कथा लिहिली, हे कंगनाचे विधान तर आणखीच धक्कादायक होते, असे अपूर्वने म्हटले आहे.

Web Title: Kangana Ranout Latu is the author of Simran's credit? Read what the episode!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.