कंगणाबाई, कोरोनाचे नियम पाळा ! किश्वर मर्चंटने विचारला प्रश्न तर नेटकऱ्यांनी केलं 'या' कारणामुळे ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 07:33 PM2021-03-11T19:33:02+5:302021-03-11T19:33:57+5:30
kishwar merchant says this woman always appear without a mask: विना मास्क कंगणार फिरतानाचे पाहून चाहत्यांसह सेलिब्रेटींनीही तिच्यावर प्रश्न निर्माण केले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. बाहेर फिरताना विनामास्क आढळल्यास 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार असा नियमच करण्यात आला आहे. त्यामुळे बाहेर फिरताना मास्क लावूनच सारे बाहेर पडतायेत. मात्र बॉलिवूडची क्वीन कंगणाला मात्र कोरोनाचा विसर पडल्याचे दिसतंय. नुकतेच तिला मुंबई एअरपोर्टवर मीडियाच्या कॅमे-यात कैद केले गेले. या वेळी विना मास्कच कंगणा फिरत असल्याचे पाहायला मिळाले.
विना मास्क कंगणार फिरतानाचे पाहून चाहत्यांसह सेलिब्रेटींनीही तिच्यावर प्रश्न निर्माण केले आहेत. टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चंटनेही विना मास्क कशी काय कंगणा फिरतेय असा प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळत आहे. सेलिब्रेटींनी तर आश्चर्यच व्यक्त केले आहे मात्र नेटीझन्सही तिला विना मास्क फिरत असल्यामुळे जबरदस्त ट्रोल केले आहे.
''ती स्वतःच एक व्हायरस आहे ''अशा कमेंट्स देत तिची खिल्ली उडवली जात आहेत. तर दुसरीकडे एका युजर्सने कोरोनासाठी लावण्यात आलेले नियम काय फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच आहेत का? अनेकदा मास्क न लावल्यामुळे सर्वसमान्यांकडे दंड वसूल केला जात आहे.
पण सेलिब्रेटींना कोणीच काही विचारत नाही. सेलिब्रेटींसाठी आणि सर्वसमान्यांसाठी नियम वेगवेगळे आहेत का? असा कमेंट करत राग व्यक्त करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. एरव्ही आपल्या बिनधास्त आणि रोखठोक मतं मांडत इतरांवर निशाणा साधणारी कंगणावर नेटीझन्सने निशाणा साधला आहे.
इसको बोलो रामदेव का जीन्स पहने...! दीपिकाला डिवचू पाहणाऱ्या कंगनाला लोकांनीच दाखवला आरसा
पहिल्यांदाच कंगणावर नेटीझन्सनी निशाणा साधला आहे असे नाही तर नुकतेच कंगणाला नेटीझन्सनी खडेबोल सुनावले होते. त्याचे झाले असे की, फाटकी जीन्स अन् चिंधी ब्लॉऊज..., अशा शब्दांत कंगनाने अप्रत्यक्षपणे दीपिकाला सुनावले होते. पण आता दीपिकाला सुनावणारी कंगना स्वत:च ट्रोल होतेय. होय, दीपिकाच्या जीन्सची खिल्ली उडवणा-या कंगनाला युजर्सनी चांगलेच सुनावले आहे.
Hypocrisy unlimited.... pic.twitter.com/inIzPdTiIP
— ᥴꪮ᭙ ᥇ꪮꪗ 🏹🚜 (@Gangohi3) March 3, 2021
इतकेच नाही, सोशल मीडियावर कंगनाच्या फाटक्या जीन्समधील फोटोंचा अख्खा अल्बम खुला केला आहे. ढोंगीपणाचा, दांभिकतेचा कळस, असे लिहित युजर्सनी कंगनाचे पाश्चात्य कपड्यांमधील फोटो शेअर केलेत. इतकी मोठी देशभक्त आहे तर हिला रामदेव बाबाची जीन्स घाल म्हणावं, असे एका युजरने लिहिले. एकंदर काय तर दीपिकाला डिवचणे कंगनाला चांगलेच महागात पडले.