कंगना राणौतसाठी लिहिली जातेय, खास कथा! वाचा संपूर्ण बातमी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 10:32 AM2017-11-27T10:32:36+5:302017-11-27T16:02:36+5:30

कंगना राणौतला काही दिवसांपूर्वीच अपघात झाला. ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’च्या सेटवर स्टंट करताना कंगनाच्या पायाला दुखापत झाली. ...

Kangana is written for Ramout, special story! Read the whole news !! | कंगना राणौतसाठी लिहिली जातेय, खास कथा! वाचा संपूर्ण बातमी!!

कंगना राणौतसाठी लिहिली जातेय, खास कथा! वाचा संपूर्ण बातमी!!

googlenewsNext
गना राणौतला काही दिवसांपूर्वीच अपघात झाला. ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’च्या सेटवर स्टंट करताना कंगनाच्या पायाला दुखापत झाली. कंगना किती गुणी अभिनेत्री आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. आपल्या कामाप्रति ती कमालीची प्रामाणिक आहे. तिचा हाच प्रामाणिकपणा लक्षात घेऊन खास कंगनाला डोळ्यांपुढे ठेवून एक भूमिका लिहिली जात आहे. ही भूमिका इतकी खास आहे की, ती कंगनाचे वय बदलणारी ठरणार आहे.

‘मणिकर्णिका’नंतर कंगना स्वत: दिग्दर्शन करणार आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. ‘तेजू’ हा चित्रपट कंगना स्वत: दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटात कंगना एका वृद्ध महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय आणखी एका चित्रपटात कंगना एका म्हाताºया महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मिस्टर इंडिया’सारखा आयकॉलिक चित्रपट साकारणारे दिग्दर्शक शेखर कपूर हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. ‘मासूम’,‘बँडिट क्वीन’,‘एलिझाबेथ’ सारखे चित्रपट बनवणाºया शेखर कपूर यांनी अलीकडे एका कार्यक्रमात हा खुलासा केला.
कंगनाला डोळ्यांपुढे ठेवून मी एक कथा लिहित आहे. ही कथा सर्वोत्तम कथांपैकी एक असेल. यात कंगना ८५ वर्षांच्या वृद्धेची भूमिका साकारताना दिसेल. यापूर्वीही मी या कथेवर चित्रपट बनवण्याचा विचार केला होता. पण आता कंगनासाठी मी नव्याने ही कथा लिहितो आहे, असे त्यांनी सांगितले. शेखर कपूर दीर्घकाळापासून जलसंकटावर ‘पानी’ नामक चित्रपट बनवू इच्छित होते. मात्र तूर्तास हा चित्रपट थंडबस्त्यात पडला आहे. मात्र आता कंगनासोबत ते नवा चित्रपट कधी हातात घेतात, ते बघणे इंटरेस्टिंग असणार आहे. 

ALSO READ : ​कंगना राणौतचा ‘डेब्यू’ अन् ‘तेजू’ लांबणीवर! वाचा संपूर्ण बातमी!!

‘तेजू’च्या स्टोरीबद्दल सांगायचे तर सूत्रांच्या मते, कथा एकदम इंटरेस्टिंग आहे. ८० वर्षांच्या एका म्हातारीला मरायचे नसते. त्यामुळे पुन्हा जिवंत होण्यासाठी ती आपल्या सुपरपॉवरचा वापर करते, अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला जाणार आहे. शिवाय लहान मुलांना समोर ठेवून तो साकारला जाणार आहे. या चित्रपटासाठी ५० कोटींचे बजेट ठेवण्यात आल्याचे कळते. कारण यात अनेक व्हीएफएक्स इफेक्ट्स असणार आहेत.

Web Title: Kangana is written for Ramout, special story! Read the whole news !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.