कंगना-हृतिकचा वाद चिघळला ; कंगनाच्या वकिलांनी मांडली आपली बाजू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2016 09:21 PM2016-11-19T21:21:29+5:302016-12-01T16:15:51+5:30
कंगना रानौत-हृतिक रोशन यांच्यात वाद संपण्याऐवजी आणखीच चिघळत चालला असल्याचे दिसते. शुक्रवारी हृतिकच्या वकिलांनी आपली बाजू मांडताना कंगनाचे वकील ...
शुक्रवारी हृतिकचे वकील महेश जेठमलानी यांनी एका निवेदनाद्वारे हृतिक-कंगना ई-मेल प्रकरणाची चौकशी बंद झाली नसल्याचे सांगितले होते. सोबतच कंगनाच्या लिगल टीमवर चुकीची माहिती देण्याचा आरोप लावला होता. कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी एका निवेदन जाहीर केले आहे. यात दिलेल्या माहितीनुसार ज्वार्इंट पोलीस कमिश्नर यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांच्या विभागाने केलेल्या चौकशीमध्ये मेल आयडीमध्ये काहीच मिळाले नाही, कारण त्याचे सर्व्हर अमेरिकेत आढळले आहे. हे सांगणे कठीण आहे की, या अकाउंटचा वापर कोण करीत आहे आणि त्याच्या शब्दातून हे स्पष्ट होते की उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर चौकशी बंद करण्यात येत आहे.
सिद्दकी यांनी आपली बाजू मांडताना लिहिले आहे की, अशा स्थितीत हृतिक आणि त्याची टीम या प्रकरणाला जाणून गुंतागुंतीचे करीत आहे आणि याच फ्रस्टेशनमध्ये ते कंगना आणि त्यांच्या टीमवर मीडियात खोट्या बातम्या पसरविण्याचा आरोप लावित आहेत. या प्रकरणात हृतिक आणि त्यांचे फॉरेंसिक एक्सपर्ट आणि वकील थेट पोलिसांशी संपर्क ठेऊन आहेत आणि जर पोलीस त्या अज्ञात व्यक्तीला शोधू शकत नसेल तर संबधित पक्षाने त्याचा स्वीकार करावा. हे देखील स्पष्ट आहे की हृतिक रोशनने मेल पाठविणाºया त्या खोट्या मेलर विरुद्ध पोलिसांत तक्रार केलेली नाही.
रिजवान सिद्दीकी यांनी आपली बाजू मांडताना हे स्पष्ट केले की, कंगना यांनी हृतिक रोशन विरुद्ध मजबूत गुन्हा दाखल केला आहे यात केवळ ई-मेल आयडीला हॅक करणे सामील नसून मीडियाला कंगना रानौतच्या प्रायव्हेट फोटो देण्याचा समावेश आहे.