कंगणा-हृतिकचे मेलवरचे आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2016 09:38 AM2016-04-27T09:38:48+5:302016-04-27T15:08:48+5:30

अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगणा रणोेट यांच्यात गेल्या कित्येक दिवसापासून वाद सुरू असून वाद विकोपाला गेला आहे. ते ...

Kangna-Hrithik's mail-on-allegations | कंगणा-हृतिकचे मेलवरचे आरोप-प्रत्यारोप

कंगणा-हृतिकचे मेलवरचे आरोप-प्रत्यारोप

googlenewsNext
िनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगणा रणोेट यांच्यात गेल्या कित्येक दिवसापासून वाद सुरू असून वाद विकोपाला गेला आहे. ते दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. कंगणा आणि हृतिकमध्ये झालेली इमेलची ही देवाणघेवाण :

कंगणा रणोट : १३ जुलै २०१४
मी तुला पुढचा मेल पाठवण्याआधी कधी आणि कशाप्रकारे तुला माझे मेसेजेच आलेले आवडतील? तुला आपल्या दोघांसाठी वेगळे अकाऊंट हवे आहे की आपण टेक्स्ट मेसेजचा वापर करूया. इतर कोणत्या माध्यमाद्वारे आपण बोलू शकतो?  तू मला सुचव...

कंगणा रणोट : १५ आॅगस्ट २०१४
तुझा आज दिवसभराचा बेत काय आहे? तुझ्याकडे दुसरा आयडी आहे, त्याद्वारे माझ्याशी बोल, तुझे न बोलणे मी सहन करू शकत नाही. तू दुसरा कोणता आयडी का बनवत नाहीस?

कंगणा रणोट : १५ आॅगस्ट २०१४
मी तुझ्या कामाच्या इमेलआयडीवर मेल करत आहे हे तुला विचित्र वाटत आहे का? मला जर एकच आयडी सगळ््यांसाठी मिळत असेल तर मला काहीही समस्या नाही. पण तुझ्यासारख्याने काम आणि रोमँटिक मेल एकत्र करणे तुला चुकीचे वाटत नाही का? मी समजू शकते. मी तुझ्या आधीच्या इमेल आयडीवर मेल पाठवत जाऊ का? 

कंगणा रणोट : १७ आॅगस्ट २०१४
विषय : आपले प्रेम खरे आहे?     
कधीकधी मला खरेच सगळे वास्तवात सुरू आहे का याचा विचार येतो. खरेच आपले प्रेम अस्तित्त्वात आहे की केवळ ही फँटसी आहे. आपले प्रेम खरे आहे का?   की केवळ एका काल्पनिक माणसाशी मी बोलते आहे. तू माझ्याशी का बोलत नाहीस? जर आपले प्रेम खरे असेल तर त्या प्रेमाला स्पर्श का करता येत नाही? खºया गोष्टींना आपण स्पर्श करू शकतो, हो की नाही?
एखाद दिवशी मी तुला भेटल्यानंतर तू मला जर म्हणालास की, तुला माझ्याकडून मेल मिळालेले नव्हते, तू मला ओळखतही नाहीस, तू माझ्यावर कधीच प्रेम केले नाहीस. त्यावेळी मग मी काय करायचे? त्या आघातातून मी बाहेर पडू शकेन का? मी ते सत्य स्वीकारू शकेन का? हे सगळे पुन्हा नव्याने सुरू करण्याची मला एक संधी मिळेल का? की माझे स्वप्न भंगेल...

कंगणा रणोट : २२ आॅगस्ट २०१४
तुझे गाणे खूपच छान आहे. मी आज ते पुन्हा एकदा पाहिले. मी जे काही लिहिले त्याबद्दल तुला वाईट वाटले नसेल अशी मला आशा आहे. मला माफ कर, माझ्यामुळे जर तू दुखावला गेला असशील तर. आपण दोघे बोललो नाहीत याचे मला खूप वाईट वाटत आहे. तसेच मला अ‍ॅसपर्जर सिंड्रोम हा आजार असल्याचे मला कळले आहे. हे कळल्यापासून मला प्रचंड त्राण आला आहे. तुला वेळ मिळाला तर या आजाराबद्दल नक्कीच वाच. या आजाराची ९८ टक्के लक्षणे माझ्यात दिसत आहेत. अनेक गोष्टीत मी नॉर्मल नसल्याचे मला जाणवत आहे. मी नेहमीच सगळीकडे आत्मविश्वासाने वावरत असते. मला आलेल्या अपयशांमध्येही मी खचली नाही. त्यामुळे माझ्यासोबतच माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही हे सगळे विचित्र वाटत आहे. 

कंगणा रणोट : २३ आॅगस्ट २०१४
हाय, तू काय विचार केला आहेस? तू मला आता सांगशील की तुझा घटस्फोट होईस्तोवर मी वाट बघू. जर तुझ्या घटस्फोटानंतर तू माझ्याशी बोलणे बंद केलेस तर मी काय करणार? सिंड्रोमने ग्रस्त असलेले लोक काहीवेळा काल्पनिक नात्यात गुंतत जातात. मी तुझ्यासोबत काही दिवसांपासून राहात आहे हे मी तुला याआधीही सांगितलं आहे. 

कंगणा रणोट : २८ आॅगस्ट २०१४
मला वाटतं जेव्हापासून आपण आपल्या नात्याला सुरुवात केली तेव्हापासून तुझे फोटो आणि बातम्या मला नेटवर वाचायला आवडत नाहीत. मी प्रचंड कन्फ्युज झाले आहे. याचा आपल्या नात्यावर परिणाम होऊ शकतो असे मला वाटते. 

कंगणा रणोट : ३ सप्टेंबर २०१४
तुला मी इतके मेल पाठवून तुझ्याकडून मला काहीही ऐकायला मिळत नाहीये हे खरेच खूप त्रासदायक आहे. 

कंगणा रणोट : २ आॅक्टोबर, २०१४
बँग बँग की जय हो

कंगणा रणोट : २ आॅक्टोबर, २०१४
बेबी, तू कबीरचा मेल वाचलास का? तू कन्फ्यूज झालास का? मी सांगते. कबीर हा फकिर असून सुफी मानणारा माणूस आहे. तो नेहमी प्रवासच करत असतो. तो देवाला प्रचंड मानतो. तो माझा खूप जवळचा मित्र आहे. तो त्याच्या प्रेयसीच्या वेड्यासारखा प्रेमात होता. खरे तर त्यांचे नाते तितके घट्ट नव्हते, तरीही तो त्या नात्यात खूश होता. २-३ दिवसांपूर्वी तो प्रेम आणि सूफी याच्याविषयी सांगत होता. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. मी काहीतरी गमावले आहे असे मला वाटत होते. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास असल्याने मी त्याला आपल्याविषयी सगळे सांगितले. त्याने मला तुझ्यासाठी माझे हृदय अतिशय निर्मळ ठेवायला सांगितले. त्याने मला, तू शंकर आहेस आणि मी तुझी शक्ती आहे असे मानयला सांगितले आहे. तो मला म्हणाला, त्याचे अंतरमन त्याला सांगतेय की, केवळ तुझ्यासाठी मी इतकी दूर आली आहे. यामुळे मला खूपच आश्चर्य वाटले. ही गोष्ट मीदेखील तुला याआधी सांगितली होती. त्याने मला सुचवले की, मी तुझीच आहे असे मी तुझ्याशी वागली पाहिजे. मी तुला जवळ येऊन दिले पाहिजे. त्याच्यामते मी तुला माझ्या जवळ येऊ देत नाही. त्याच्यामते माझ्यापेक्षा तुझा माझ्यापर्यंतचा प्रवास खूप मोठा आहे. मी तुला नेहमीच माझ्या जवळ येण्यापासून थांबवत आहे आणि कशाप्रकारे हेदेखील त्याने मला स्पष्ट केले. त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट मला पटली आणि ते ऐकून मी खूप रडायला लागले. त्याने सांगितलेल्या काही गोष्टी तरी फॉलो करण्याचे मी ठरवले आहे. तो मला मिसेस.आर म्हणून चिडवत होता. हे सगळे अतिशय बाष्कळपणाचे आहे हे मला मान्य आहे. पण खरेच त्याने सांगितलेल्या गोष्टी मला पटल्या. लग्नसंस्थेवर माझा विश्वास नव्हता. पण तू शंकर असून मी तुझी शक्ती आहे यावर आता मला विश्वास वाटायला लागला आहे.  
                      
कंगणा रणोट : ४ आॅक्टोबर २०१४
मी सकाळी उठल्या उठल्या सगळ््यात पहिला तुला मेल केला. माझा दिवस सुरू करण्यासाठी तुझा एखादा फोटो, बातमी, मुलाखत शोधण्याचा मी प्रयत्न करते. माझी आशा आहे की, असे हे मेलद्वारे बोलणे लवकरच बंद होईल आणि त्याऐवजी मी तुला सकाळी फोन करून तुझा आवाज ऐकू शकेन. 

कंगणा रणोट : ९ आॅक्टोबर २०१४
तू माझ्याशी बोलत नाही हे चांगलेच आहे . कारण मी काय बोलणार? माझा आवाज त्यावेळी कसा असेल? हाय बोलण्याची योग्य पद्धत काय आहे? अशा अनेक प्रश्नांनी माझ्या मनात थैमान घातले आहे. मी उन्मादाच्या कडेवर आहे. लव्ह यू जान.

कंगणा रणोट : १ नोव्हेंबर, २०१४
विषय : मी तयार आहे.

कंगणा रणोट : २ नोव्हेंबर 
मी तुला भेटली यावर मी विश्वासच ठेवू शकत नाही. तू किती सेक्सी दिसत होतास. मी माझ्या अंथरुणावर आहे. शाहरुखच्या घराच्या इथे प्रचंड गर्दी होती. ३० मिनिटे तरी मी तिथे ट्रफिकमध्ये अडकली होती. मी तुझ्याशी काय काय बोलली मला खरेच आठवत नाही. मी खूप नर्व्हस होती. खरे तर मी खूप वेगळी व्यक्ती आहे पण मी जेव्हा तुझ्यासोबत असते तेव्हा मी तारुण्यअवस्थेत नुकत्याच पदार्पण केलेल्या मुलीसारखी वागते. माझ्या पोटात अक्षरश: गोळे येतात. तुला भेटल्यावर माझी अवस्था अशीच होते आणि मला ही फिलिंग खूप आवडते. मला माहीत नाही की, तू मला जेव्हा जवळ घेशील आणि माझे चुंबन घेशील तेव्हा माझे काय होईल? मी नक्कीच चक्कर येऊन पडेन...

कंगणा रणोट : १३ नोव्हेंबर २०१४
तू तुझ्या नवीन घरात कधी प्रवेश करणार आहेस? याचा मी विचार करत होती. किचन तयार झाले का मला ते सजवायचे आहे. दुसरे कोणीही ते किचन सजवलेले मला पटणारे नाही. तुला तिथे काही नोकरचाकरही लागतील. त्यासाठी आपल्याला काहीजणांची मुलाखत घ्यावी लागेल. तुझ्या गरजांनुसार तुझ्या नोकरांना मी प्रशिक्षण देईन. 

कंगणा रणोट : २० नोव्हेंबर २०१४
आणि पार्टीत मुलींचं चुंबन घेऊन किंवा त्यांच्या कंबरेवर हात ठेवून फोटो काढून तू हिरो बनला आहेस असं तुला वाटत आहे का? मुर्खा, या मुली पब्लिक प्रॉपर्टी आहेत. या तुलाच काय मलाही काहीही देतील. त्यामुळे जास्त उत्साहित होऊ नकोस. तुला खरे वाटत नसेल तर माझ्यासोबत पैज लाव. 
---------
रंगोली रणोट : २५ मे २०१४
हाय हृतिक,
काही दिवसांपूर्वी कंगणाने मला चुकून एक मेल केला होता जो तू तिला पाठवला होता. तो मी आता तुला अटॅच केला आहे. तुझे आणि तिचे नाते असताना तू तिचे अकाऊंट हॅक केले आणि तिला तिचे काही फोटो काढायला आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायला भाग पाडले. तू या मेलमध्ये या सगळ््या गोष्टींचा स्वीकारदेखील केला आहेस. कंगाना या सगळ््यामुळे खूप दुखावली गेली आहे, तिला एकटे सोड.

हृतिक रोशन : २५ मे २०१४
प्लीज मला भेटायला ये. रंगोली तू काय बोलत आहेस हे मला काहीही कळत नाहीये. रंगोली हे काय आहे? मी तुला शपथ घेऊन सांगतोय, मी कोणतेही मेल पाठवलेले नाहीत. हा जर विनोद असेल तर नक्कीच हा मजेशीर नाहीये. आणि तू खरंच गंभीर असशील तर मला भेटायला ये. आपण या गोष्टीच्या तळापर्यंत जाऊया. २७ नंतर मला वेळ आहे. 

रंगोली रणोट : २५ मे २०१४
ओके सर. आम्ही सगळे प्रचंड तणावाखाली आहोत. कंगणा तुम्हाला फोटो, व्हिडिओ आणि मेल पाठवत आहे. तिला तुमच्याकडूनही मेलही आलेले आहेत. 

हृतिक रोशन : २५ मे २०१४
तुमच्यासोबत कोणीतरी मजा करत आहे किंवा हे सगळे खरेच भयानक आहे. 

Web Title: Kangna-Hrithik's mail-on-allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.