कंगना राणौतने पुन्हा केला इंडस्ट्रीवर ‘हल्ला’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 07:20 AM2017-11-05T07:20:03+5:302017-11-05T12:50:03+5:30
अंगावर आलेल्या प्रत्येकाला शिंगावर घेणे, हा कंगना राणौतचा स्वभाव. स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणा-या कंगनाने पुन्हा ...
अ गावर आलेल्या प्रत्येकाला शिंगावर घेणे, हा कंगना राणौतचा स्वभाव. स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणा-या कंगनाने पुन्हा आपल्या याच स्वभावाचे दर्शन घडवले आहे. होय, मी कायम लढत राहिल, असे तिने म्हटले आहे.
आयएएनएसला दिलेल्या एका ई-मेल इंटरव्ह्यूमध्ये कंगना पुन्हा बोलली. बॉलिवूडमध्ये लोक कायम दुसºयाला कमजोर ठरवू बघतात. त्यामुळे इथे स्वत:च्या मतांवर ठाम राहणे बरेच कठीण आहे. मी इंडस्ट्रीत आऊटसाईडर आहे. त्यामुळे इथे स्वत:ची जागा बनवण्यासाठी मला संघर्ष करावाच लागेल. मलाही स्वत:ची मते आहेत आणि स्वत:चे हे विचार मुक्तपणे जगासमोर मांडण्याचा मार्ग मला अधिक जवळचा वाटतो. काही लोक तुम्हाला दुबळे ठरवण्याचा प्रयत्न करणार. पण तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवावा लागेल आणि यासाठी प्रत्येकाशी दोन हात करण्याची तयारीही ठेवावी लागेल. कारण माझ्यामते, चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवता यायला हवा, असे कंगना म्हणाली. मी माझ्या प्रत्येक कृतीतून महिलांना प्रोत्साहित करण्याचे प्रयत्न करते. माझ्या मते, प्रत्येक महिलेला शारिरीक, मानसिक व सामाजिकदृष्टीने फिट होणे गरजेचे आहे. माझी कहाणी अन्य महिलांना लढण्यासाठी प्रेरित करेल, अशी मी आशा करते, असेही कंगना म्हणाली.
कंगनाला बॉलिवूडच्या ‘राजकारणात’ कुठलाही रस नाही. त्यामुळे आपल्या काही वर्षांच्या करिअरमध्ये कंगनाने बॉलिवूडमध्ये अनेक बड्या बड्या लोकांशी पंगे घेतले. अनेकांना शत्रू निर्माण केलेत. हृतिक रोशन, राकेश रोशन, करण जोहर असे अनेकांच्या यादीत कंगना ‘शत्रू’ बनून राहिलीय. साहजिक बॉलिवूडमधील एक गट कायम कंगनाकडे दुर्लक्ष करतो, तिला टाळू पाहतो. अलीकडे हृतिक रोशनसोबतच्या वादानंतर तर या गटाने कंगनाला जणू अघोषितरित्या बहिष्कृत केले आहे.
ALSO READ: कंगना राणौतचे ‘ते’ फोटो लीक झाले नव्हते तर लीक केले गेले होते! वाचा एक आतली बातमी!!
अलीकडे कंगनाने हृतिकसोबतच्या तिच्या कथित अफेअरवर नको ते खुलासे केले होते. ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात कंगनाने हृतिकवर घणाघाती आरोप केले होते. हृतिक सोबत माझे अफेअर होते, मी त्याच्याशी लग्न करायलाही तयार होते. हृतिकनेही पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर लग्नाची तयारी दर्शवली होती. पण नंतर तो पलटला आंिण माझे पर्सनल मॅसेज व व्हिडिओ लीक करण्याची धमकी मला दिली, असे काय काय कंगना या शोमध्ये बोलली होती.