कुटुंबासह गोव्यात गेलेल्या अभिनेत्याचा गंभीर अपघात; बंगळुरुमध्ये उपचार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 14:08 IST2022-06-22T14:07:48+5:302022-06-22T14:08:17+5:30
Kannada actor dignath: दिगनाथचा अपघात झाल्यानंतर त्याला गोव्यातील मनिपल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर बंगळुरुमध्ये एअरलिफ्ट करण्यात आलं.

कुटुंबासह गोव्यात गेलेल्या अभिनेत्याचा गंभीर अपघात; बंगळुरुमध्ये उपचार सुरु
कुटुंबासह गोव्यात फिरायला गेलेल्या एका दाक्षिणात्य अभिनेत्याचा अपघात झाला आहे. या अपघातात अभिनेता गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोव्यात उपचार सुरु होते. मात्र, आता त्याला बंगळुरुमध्ये एअरलिफ्ट करण्यात आलं आहे.
कन्नड कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता दिगनाथ (Dignath) काही दिवसांपूर्वी कुटुंबासह गोव्यात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. मात्र, या काळात अॅडव्हेंचर करण्याच्या नादात त्याच्या पाठिच्या कण्याला (Spinal Cord) गंभीर दुखापत झाली. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दिगनाथचा अपघात झाल्यानंतर त्याला गोव्यातील मनिपल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर बंगळुरुमध्ये एअरलिफ्ट करण्यात आलं.
दरम्यान, दिगनाथ दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने कन्नड कलाविश्वात अनेक प्रोजेक्टवर काम केलं आहे. तसंच काही हिंदी मालिकांमध्येही तो झळकला आहे. त्यामुळे आज त्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच त्याच्या अपघाताची माहिती मिळताच चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.