Viral Video : पार्कमध्ये वर्कआऊट करताना अभिनेत्री संयुक्ता हेगडेवर हल्ला, ड्रेसवरून झाला वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 10:06 AM2020-09-06T10:06:36+5:302020-09-06T10:07:01+5:30
व्हिडीओत संयुक्तावर पार्कमध्ये हल्ला झाल्याचे दिसतेय. कारण काय तर सार्वजनिक ठिकाणी तिने स्पोर्ट ड्रेस घातला म्हणून....
साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि एमटीव्ही स्पिल्टविला 11ची स्पर्धक संयुक्ता हेगडे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर रोज नवे बोल्ड फोटो शेअर करून ती चर्चेत राहते. आता संयुक्ता एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. संयुक्ताचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ बेंगळुरुच्या एका पार्कमधील आहे. या व्हिडीओत संयुक्तावर पार्कमध्ये हल्ला झाल्याचे दिसतेय. कारण काय तर सार्वजनिक ठिकाणी तिने स्पोर्ट ड्रेस घातला म्हणून.
तर घटना आहे, गेल्या शुक्रवारची़ शुक्रवारी संयुक्ता तिच्या मित्रांसोबत पार्कमध्ये वर्कआऊटसाठी गेली होती. मात्र यादरम्यान एका महिनेने गोंधळ घातला. शिवाय संयुक्तासोबत गैरवर्तन केले. यादरम्यान महिला संयुक्ता व तिच्या फ्रेन्डचा व्हिडीओ बनवू लागली. संयुक्ताने यावर आक्षेप घेतला असताना, संबंधित महिलेने तिच्यावर हल्ला केला. सार्वजनिक ठिकाणी स्पोर्ट ड्रेस घातल्याबद्दल या महिलेने संयुक्ताला सर्वांसमोर अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळ केली.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ संयुक्ताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने बेंगळुरूचे पोलिस कमिशनर आणि शहराच्या पोलिस अधिका-यांना टॅग केले आहे. संयुक्तावर हल्ला करणा-या महिलेचे नाव कविता रेड्डी असल्याचे कळतेय.
ऋचा चड्ढा भडकली
Just because you think someone isn’t dressed like they ought to,in YOUR opinion, gives you no right to charge towards them or slap them. The world doesn’t need more moral policing, especially not from sanctimonious aunties. Plz behave. Respect is a 2 way street. @INCKarnatakahttps://t.co/vzqnf8Ex6k
— TheRichaChadha (@RichaChadha) September 5, 2020
संयुक्ताचा हा व्हिडीओ पाहून बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा जाम भडकली. व्हिडीओ शेअर करत तिने आपली नाराजी व्यक्त केली. ‘हे सगळे यासाठी की, कोणी तुमच्या आवडीचे कपडे घातले नाहीत. कपड्यांवरून तुम्हाला एखाद्याला थप्पड मारण्याचा वा गैरवर्तन करण्याचा अधिकार नाही. जगाला आणखी अधिक मोरल पोलिसिंगची गरज नाही. विशेषत: अशा पवित्र काकूंकडून तर अजिबात नाही. आदर हा दुहेरी मार्ग आहे,’ असे ऋचा चड्ढाने यावर लिहिले.