Kishore Kumar G: ‘केजीएफ 2’ सारखा बिनडोक सिनेमा...,‘कांतारा’ फेम अभिनेता हे काय बोलून गेला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 13:38 IST2023-01-08T13:37:43+5:302023-01-08T13:38:15+5:30
Kantara Actor Kishore Kumar G : ‘कांतारा’ फेम किशोर कुमार जी ‘केजीएफ 2’बद्दल असं काही बोलून गेला की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

Kishore Kumar G: ‘केजीएफ 2’ सारखा बिनडोक सिनेमा...,‘कांतारा’ फेम अभिनेता हे काय बोलून गेला?
कन्नड सुपरस्टार यशचा ‘KGF’ व ‘KGF 2’ या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ‘केजीएफ 2’ तर 2022 या वर्षातला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. या सिनेमानं सुमारे 1200 कोटी कमावले. प्रेक्षकांना हा सिनेमा प्रचंड आवडला. पण ‘कांतारा’ फेम किशोर कुमार जी (Kantara Actor Kishore Kumar G ) याचं मत जरा वेगळं आहे. त्याच्या मते, ‘केजीएफ 2’ हा एक ‘माइंडलेस’ (बिनडोक ) सिनेमा आहे.
‘कांतारा’ या सिनेमात किशोर कुमार जी याने वनअधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचं अपार कौतुक झालं. अलीकडे त्याचं ट्विटर अकाऊंट सस्पेन्ड झालं होतं. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तो चर्चेत असतो. आता तो ‘केजीएफ 2’बद्दल असं काही बोलून गेला की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
काय म्हणाला अभिनेता?
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत किशोर कुमार जी याने ‘केजीएफ 2’बद्दल मत मांडलं. तो म्हणाला, ‘हे बरोबर आहे की चूक मला माहित नाही. पण मी ‘केजीएफ 2’ हा सिनेमा अद्याप बघितलेला नाही. ही माझी पर्सनल चॉईस आहे. केजीएफ सारखा सिनेमा बघण्याऐवजी मला छोट्या बजेटचे उत्तम सिनेमे बघायला आवडतील. जे भलेही हिट नसो पण गंभीर आहेत, संवेदनशील आहेत. केजीएफ सारखा बिनडोक सिनेमा बघण्यात मला इंटरेस्ट नाही. हा माझ्या टाइपचा सिनेमा नाही. ’
कन्नड चित्रपट ‘अट्टाहासा’ मधील वीरप्पनची भूमिका किशोर कुमार जीची विशेष गाजली. केवळ कन्नडच नव्हे तर तामिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये तो काम करतो. लवकरच तो आता एका हिंदी चित्रपटात झळकणार आहे.
यशने मात्र कांताराचं भरभरून कौतुक केलं होतं...
‘कांतारा’फेम किशोर कुमार जीने ‘केजीएफ 2’ला माइंडलेस सिनेमा म्हटलं असलं तरी केजीएफ स्टार यशने मात्र ‘कांतारा’चं भरभरून कौतुक केलं होतं. एका युजरने चुकून ‘कांतारा’ला यशचा सिनेमा म्हणत आपल्या पोस्टमध्ये यशला टॅग केलं होतं. यावर, ‘कांतारामध्ये मी नाही. पण हा माझा सिनेमा आहे,’ असं यश म्हणाला होता. ‘केजीएफ 2’ हा एक अॅक्शन सिनेमा आहे. यात यशने रॉकीची भूमिका साकारली होती.