Kantara: कन्नड सिनेमा माझा आत्मा, बॉलिवूडमध्ये काम करणार नाही..., ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टी स्पष्टच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 15:30 IST2022-11-09T15:30:15+5:302022-11-09T15:30:28+5:30
Kantara Actor Rishab Shetty : ‘कांतारा’ सुपरडुपर हिट झाल्यानंतर सगळीकडे ऋषभ शेट्टीची चर्चा आहे. बॉलिवूडमध्येही त्याच्या नावाची चर्चा होताना दिसतेय.

Kantara: कन्नड सिनेमा माझा आत्मा, बॉलिवूडमध्ये काम करणार नाही..., ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टी स्पष्टच बोलला
सध्या एकाच सिनेमाची चर्चा आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाने हवा केलीये. हा चित्रपट कोणता तर कांतारा (Kantara). होय, मूळ कन्नड भाषेत बनलेल्या ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाये. चित्रपटाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता हा सिनेमा हिंदीत डब करण्यात आला. पाठोपाठ हिंदीत रिलीज झाला. ‘कांतारा’च्या हिंदी व्हर्जननेही बक्कळ कमाई केली. अजूनही हा सिनेमा गर्दी खेचतोय. भविष्यात ‘कांतारा’चा बॉलिवूड रिमेक पाहायला मिळणार, अशी तुमची अपेक्षा असेल तर फार अपेक्षा न केलेली बरी. कारण ‘कांतारा’चा हिरो व डायरेक्टर ऋषभ शेट्टीने (Rishab Shetty) आधीच याला नकार दिला आहे.
‘कांतारा’चा बॉलिवूड रिमेक बनावा, अशी माझी अजिबात इच्छा नाही, असं ऋषभ शेट्टीने स्पष्ट केलं आहे. बॉलिवूडमध्ये काम करण्याचीही त्याची अजिबात इच्छा नाही. ‘कांतारा’ सुपरडुपर हिट झाल्यानंतर सगळीकडे ऋषभ शेट्टीची चर्चा आहे. बॉलिवूडमध्येही त्याच्या नावाची चर्चा होताना दिसतेय. पण बॉलिवूडमध्ये काम करण्याची ऋषभ शेट्टीची मुळीच इच्छा नाही.
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत तो यावर बोलला. मला फक्त कन्नड सिनेमे करायचे आहेत. मी कन्नडिया आहे आणि याचा मला अभिमान आहे. आज मी जो काही आहे, ती कन्नड फिल्म इंडस्ट्री आणि कन्नड लोकांमुळे आहे. माझा एक सिनेमा सुपरहिट झाला म्हणून मी बदलणारा नाही. माझं कुटुंब, माझे मित्र बदलणार नाहीत. कन्नड सिनेमा हा माझा आत्मा आहे, असं ऋषभ शेट्टीने स्पष्ट केलं.
याआधी साऊथच्या अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये काम करण्याची ऑफर धुडकावून लावली आहे. केजीएफ स्टार यश आणि तेलगू चित्रपटांचा सुपरस्टार महेश बाबू या नावांचा यात समावेश आहे. महेश बाबूने तर बॉलिवूड मला अफोर्ड करू शकत नाही, असं म्हणत बॉलिवूडमध्ये काम करण्याची आॅफर धुडकावून लावली आहे.