Kantara! 16 कोटींचा बजेट अन् कमावले 353 कोटींपेक्षा अधिक..., आता रचला नवा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 03:02 PM2022-11-10T15:02:10+5:302022-11-10T15:03:55+5:30

Kantara Box Office Collection Report Day 41: ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या सिनेमाने धमाका केला आहे. एकीकडे या चित्रपटाने देशात 276.56 कोटींचा गल्ला जमवला, दुसरीकडे एका अनोख्या विक्रमावर नाव कोरलं.

Kantara Creates A New Record 1 Crore Tickets Sold In Karnataka Box Office | Kantara! 16 कोटींचा बजेट अन् कमावले 353 कोटींपेक्षा अधिक..., आता रचला नवा विक्रम

Kantara! 16 कोटींचा बजेट अन् कमावले 353 कोटींपेक्षा अधिक..., आता रचला नवा विक्रम

googlenewsNext

Kantara  Box Office Collection Report Day 41: ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’  (Kantara) या सिनेमाने धमाका केला आहे. एकीकडे या चित्रपटाने देशात 276.56 कोटींचा गल्ला जमवला, दुसरीकडे एका अनोख्या विक्रमावर नाव कोरलं. होय, कर्नाटकात या चित्रपटाने 1 कोटी तिकिट विक्रीचा विक्रम रचला आहे.
केवळ 16 कोटी रूपयांत बनलेल्या या चित्रपटाच्या कन्नड व्हर्जनने 41 दिवसांत 151.80 कोटींचा बिझनेस केला आहे. वर्ल्डवाईड कमाईबद्दल सांगायचं तर या चित्रपटाने 353 कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे.

‘कांतारा’ हा सिनेमा ऋषभ शेट्टीने दिग्दर्शित केला आहे. त्यानेच चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि तोच या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. 30 सप्टेंबरला कन्नड भाषेत हा सिनेमा रिलीज झाला. यानंतर 14 ऑक्टोबरला हिंदी, तामिळ, तेलगू व मल्याळम भाषेत चित्रपट प्रदर्शित केला गेला. सर्व भाषांमध्ये ‘कांतारा’ने देशात 276.56 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे.

 

हिंदी व्हर्जनने कमावले इतके कोटी
‘कांतारा’च्या हिंदी व्हर्जनवरही प्रेक्षकांच्या उड्या पडत आहेत. मंगळवारी या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 2.6 कोटींची कमाई केली. बुधवारी हा आकडा 1.5 कोटी होता. गेल्या 27 दिवसांत ‘कांतारा’च्या हिंदी व्हर्जनने 68.5 कोटींचा गल्ला जमवला आहे.

कोण आहे ऋषभ शेट्टी
12 वर्षांपूर्वी ऋषभ शेट्टीने आपला अभिनयाचा प्रवास सुरू केला होता  तेव्हा एकदिवस आपण इतका मोठा स्टार बनू, असं त्यालाही वाटलं नव्हतं. पण आज ऋषभ शेट्टी मोठा स्टार आहे. सगळेच त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत. ‘कांतारा’मधील त्याचा अभिनय, त्याचं दिग्दर्शन पाहून सगळे स्तब्ध आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ऋषभचा फिल्मी इंडस्ट्रीशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. म्हणजे तो या इंडस्ट्रीत आऊटसाइडर आहे. पण याऊपरही आपल्या मेहनतीच्या जोरावर तो इथपर्यंत पोहोचला. यासाठी तब्बल 18 वर्षे त्याने अथक प्रयत्न केलेत. स्ट्रगल केला.

ऋषभ शेट्टीने कॉलेज पूर्ण केल्यानंतर अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने थिएटरमध्ये काम करायला सुरूवात केला. ‘कुंडापुरा’ हे त्याचं पहिलं नाटक हळूहळू तो नाटकात रूळला. लोकांनी त्याच्या अभिनयाचं कौतुक सुरू केलं आणि हे पाहून ऋषभचा आत्मविश्वास वाढला. कॉलेजच्या दिवसांत छोटंमोठं काम करून तो पैसा कमावयचा. कधी त्याने पाण्याच्या बाटल्या विकल्या तर कधी रिअल इस्टेटमध्ये काम केलं. काही दिवस अगदी हॉटेलातही तो राबला. सोबत सोबत अ‍ॅक्टिंगमध्ये त्याचे प्रयत्न सुरू होते.2004 मध्ये त्याला पहिली संधी मिळाली. Nam Areali Ondina या चित्रपटात त्याला एक भूमिका मिळाली. पण त्याच्या भूमिकेला कोणतंही नाव नव्हतं. फक्त नावापुरती ही भूमिका ऋषभने हसत हसत स्विकारली. यानंतर अशाच अनेक चित्रपटांत छोटे छोटे रोल केलेत. कधी कॅमिओ तर कधी भिकाऱ्याचा रोल केला.

Web Title: Kantara Creates A New Record 1 Crore Tickets Sold In Karnataka Box Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.