Kantara कांताराचा बॉक्सऑफिसवर धुमाकुळ, Worlwide कोट्यावधींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 07:21 PM2022-11-22T19:21:33+5:302022-11-22T19:24:23+5:30

साऊथचा सिनेमा बॉलिवुडवर भारी पडतोय हे वेळोवेळी सिद्ध होत आहे. नुकताच रिलीज झालेल्या कांतारा या सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. चित्रपटाने कमाईच्या बाबतीत इतिहास रचला आहे.

kantara-crosses-400-cr-collection-worldwide | Kantara कांताराचा बॉक्सऑफिसवर धुमाकुळ, Worlwide कोट्यावधींची कमाई

Kantara कांताराचा बॉक्सऑफिसवर धुमाकुळ, Worlwide कोट्यावधींची कमाई

googlenewsNext

साऊथचा सिनेमा बॉलिवुडवर भारी पडतोय हे वेळोवेळी सिद्ध होत आहे. नुकताच रिलीज झालेल्या कांतारा या सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. सिनेमाची माऊथ पब्लिसिटीच इतकी झाली आहे की प्रत्येक जण कांताराची चर्चा करत आहे. बॉलिवुडचे सिनेमे यासमोर काहीच नाही अशी प्रतिक्रिया चाहते देता आहेत. साऊथचा सुपरस्टार आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांचा कांतारा १४ ऑक्टोबर रोजी हिंदी मध्ये रिलीज झाला . एक महिना उलटुन गेला तरी कांतारा ची जादु काही कमी झालेली नाही. यावरुन कल्पना करु शकता कांताराने बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवला असेल.

३० सप्टेंबर रोजी कांतारा कन्नड भाषेत रिलीज झाला. सुरुवातीपासूनच सिनेमाचा साऊथमध्ये दबदबा बघायला मिळाला. यानंतर १४ ऑक्टोबर रोजी हिंदीमध्ये प्रदर्शित झाला. मग मात्र सिनेमाने उसळीच घेतली. कमाईच्या बाबतीत कांताराने इतिहासच रचला आहे. जगभरात कांताराने तब्बल ४०० कोटींची कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी यांनी सोशल मीडियावर कांताराचे वर्ल्डवाईड कलेक्शन शेअर केले आहे. त्यानुसार कांताराने ४०० कोटींचा गल्ला जमवला आहे. 



विदेशातही कांताराचा बोलबाला 

परदेशात कांतारा ने ४४.५ कोटींची कमाई केली आहे. कांतारा मध्ये सुपरस्टार ऋषभ शेट्टीने अप्रतिम काम केले आहे याखेरीज दिग्दर्शन ही केले आहे. त्यामुळे यामागे ऋषभचे कौतुक करावे तितके कमीच आहे. 
 

Web Title: kantara-crosses-400-cr-collection-worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.