Kapil Sharam: ... जेव्हा कपिल शर्मा प्लॅनिटा गाडीवरुन फिरतो, पाठीवरही दिसतंय ओझं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 10:37 PM2022-03-18T22:37:30+5:302022-03-18T22:45:08+5:30

Kapil Sharam: कपिल शर्माने चाहत्याचे हे ट्विट रिट्विट केलं असून किसी को बताना मत.. अशी मजेशीर कमेंट केली आहे

Kapil Sharam: ... When Kapil Sharma rides a Planita byke in bhuwaneshwar, he also carries a load on his back | Kapil Sharam: ... जेव्हा कपिल शर्मा प्लॅनिटा गाडीवरुन फिरतो, पाठीवरही दिसतंय ओझं

Kapil Sharam: ... जेव्हा कपिल शर्मा प्लॅनिटा गाडीवरुन फिरतो, पाठीवरही दिसतंय ओझं

googlenewsNext

मुंबई - बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्मा अभिनेत्री नंदीता दासच्या चित्रटात झळकणार आहे. त्यासाठी, सध्या तो ओडिशात चित्रपटाचे शुटींग करत आहे. विशेष म्हणजे गुरुवारीच कपिलने ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची भेट घेतली होती. दरम्यान, आज कपिल शर्माचा रस्त्यावर प्लॅटिना गाडीवरचा एक फोटो व्हायरल झाला आहे. एका चाहत्याने ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच, सर मी तुम्हाला आज लाईव्ह पाहिलं, असं कॅप्शन त्या चाहत्याने दिलं आहे. 

कपिल शर्माने चाहत्याचे हे ट्विट रिट्विट केलं असून किसी को बताना मत.. अशी मजेशीर कमेंट केली आहे. या फोटोत कपिल शर्मा प्लॅटिना दुचाकीवर वाहतूक कोंडीत अडकल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे त्याच्या खांद्यावर ओझंही दिसत आहे. म्हणजेच कपिल शर्मा डिलिव्हरी बॉय बनल्याचं दिसून येत आहे. एकंदरीतच हा फोटो चित्रपटाच्या शुटींग सीनमधील असून कपिलने त्यात डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली आहे. कपिलने शेअर केलेल्या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्यावरुन हा फोटो भुवनेश्वरचा असल्याचे दिसून येते. 

कपिलने घेतली मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची भेट

"तुम्ही तुमच्या चित्रपटांप्रमाणेच मला या सुंदर राज्याची, तिथल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख करून दिल्याबद्दल नंदिता दास यांचे विशेष आभार", असं ट्विट कपिल शर्मानं गुरुवारी केलं आहे. कपिलने मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट गेतली. त्यावेळी, सोबत नंदिता दासही उपस्थित होती. त्यांनीच कपिल शर्मा आणि मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली. कपिल लवकरच नंदिता दासच्या चित्रपटात दिसणार आहे. कपिलने काही दिवसांपूर्वीच याची घोषणा केली होती. या चित्रपटात कपिल डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारत आहे.

Web Title: Kapil Sharam: ... When Kapil Sharma rides a Planita byke in bhuwaneshwar, he also carries a load on his back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.